लाईफस्टाईल

नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन! झटपट आणि कुरकुरीत रवा सॅन्डविच रेसिपी

सकाळी धावपळीत पटकन बनणारं आणि सगळ्यांना आवडणारं काही हवंय? मग ही खास रवा सॅन्डविच रेसिपी तुमच्यासाठीच! घरात अगदी थोड्या साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही डिश मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल.

Mayuri Gawade

सकाळी धावपळीत पटकन बनणारं आणि सगळ्यांना आवडणारं काही हवंय? मग ही खास रवा सॅन्डविच रेसिपी तुमच्यासाठीच! घरात अगदी थोड्या साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही डिश मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल. चला तर मग जाणून घेऊया ही झटपट आणि चविष्ट रवा सॅन्डविच रेसिपी!

साहित्य :

  • २ वाटी रवा

  • १ वाटी दही

  • १ कांदा (बारीक चिरलेला)

  • १ शिमला मिरची (बारीक चिरलेली)

  • १ टोमॅटो (बारीक चिरलेला)

  • हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

  • कोथिंबीर (बारीक चिरलेली)

  • चवीपुरतं मीठ

  • ब्रेड स्लाइस

  • तेल

कृती :

एका भांड्यात रवा घेऊन त्यात दही मिसळा. त्यामध्ये कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि मीठ घाला. वरून कोथिंबीर टाकून सगळं चांगलं मिक्स करा. नंतर या मिश्रणात थोडं उकळलेलं पाणी घालून मध्यमसरशी घोळ तयार करा. हा घोळ १०-१५ मिनिटं झाकून ठेवावा.

आता पॅनवर थोडं तेल टाकून गरम करून घ्या. ब्रेडच्या स्लाइसला तयार घोळात बुडवून दोन्ही बाजूंनी मंद आचेवर शेकून घ्या. ब्रेड सोनेरी तपकिरी झाल्यावर गॅसवरून उतरवा.

असं करून काही मिनिटांत तयार होतं झटपट आणि चविष्ट रवा सॅन्डविच. हे सँडविच सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह केलं, की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटणार हे नक्की!

'लाडकी बहीण' योजनेचा बेकायदा लाभ येणार अंगलट ; महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत होणार कारवाई

MMRDA ला अखेर जाग; मोनोरेलची प्रवासीक्षमता निश्चित; गाड्यांची तपासणी होणार

MIDC मधील झोपड्या ४ महिन्यांत हटवा; मुंबई उच्च न्यायालयाचे नवी मुंबई पालिकेला आदेश

Mumbai : पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने बंद; जैन समाजाची मागणी BMC कडून मान्य

विम्याचा हप्ता होणार कमी; आरोग्य-जीवनविम्याला GST तून वगळणार?