लाईफस्टाईल

Republic Day Saleची धमाकेदार सुरुवात; iPhone 17वर मोठा डिस्काउंट, पाहा Amazon, Flipkart च्या ऑफर्स

काही आठवड्यांपूर्वी ज्या ऑफर्स अशक्य वाटत होत्या, त्या आता ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी सहज उपलब्ध झाल्या आहेत. आता iPhone 17...

किशोरी घायवट-उबाळे

भारताचा ७७वा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि विजय सेल्ससारख्या प्रमुख रिटेलर्सनी रिपब्लिक डे सेल सुरू करत iPhone मॉडेल्सवर ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि iPhone Air यांच्यासोबतच लोकप्रिय iPhone 15 वरही आकर्षक डिस्काउंट दिले जात आहेत. काही आठवड्यांपूर्वी ज्या ऑफर्स अशक्य वाटत होत्या, त्या आता ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी सहज उपलब्ध झाल्या आहेत.

फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल (Flipkart Republic Day Sale)

फ्लिपकार्टवर iPhone 17 ची किंमत सध्या ₹८२,९०० आहे. मात्र HDFC बँक कार्ड वापरल्यास बँक डिस्काउंटनंतर हा फोन ₹७४,९९९ किंवा त्याहून कमी किमतीत मिळू शकतो.
iPhone 15 वरही चांगली सूट मिळत असून एक्स्चेंज ऑफरमुळे अंतिम किंमत आणखी कमी होऊ शकते.

ॲमेझॉन रिपब्लिक डे सेल (Amazon Republic Day Sale)

ॲमेझॉनवर iPhone 17 Pro आणि Pro Max वरही आकर्षक ऑफर्स आहेत.
SBI कार्ड डिस्काउंट आणि कूपनचा फायदा घेतल्यास iPhone 17 Pro Max (लॉन्च किंमत ₹१,४९,९००) ₹१,४०,४०० मध्ये मिळू शकतो. iPhone Air मॉडेलही ऑफर्ससह ₹१ लाखाच्या आत उपलब्ध आहे. याशिवाय इतर स्मार्टफोन आणि ॲक्सेसरीजवरही सवलती दिल्या जात आहेत.

विजय सेल्स रिपब्लिक डे सेल (Vijay Sales Republic Day Sale)

विजय सेल्सनेही रिपब्लिक डे सेल सुरू केला असून येथे iPhone 17 येथे HDFC बँक डिस्काउंटनंतर ₹७८,९०० मध्ये उपलब्ध आहे. यासोबतच, ग्राहकांना लॉयल्टी पॉइंट्सही मिळणार आहेत, जे पुढील खरेदीसाठी वापरता येतील. बजेट-फ्रेंडली ग्राहकांसाठी जुन्या iPhone मॉडेल्सवर चांगले पर्याय उपलब्ध आहेत.

iPhone खरेदीसाठी उत्तम संधी

रिटेल तज्ज्ञांच्या मते, या वर्षी सर्व प्लॅटफॉर्म्सवर ॲपल स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफर्स सर्वाधिक आहेत. मात्र, ग्राहकांनी खरेदी करण्यापूर्वी बँक ऑफर, एक्स्चेंज रेट आणि कूपन तसेच अंतिम किंमत तपासूनच खरेदी करावी.

मुंबईत NOTA झाला मोठा! कोणत्या प्रभागात सर्वाधिक वापर, कुठे अत्यल्प प्रतिसाद? बघा टॉप ५ लिस्ट

समुद्राखाली हालचाल! वसईच्या समुद्रात अचानक 'रिंगण'; थोडक्यात वाचली मासेमारीसाठी गेलेली बोट, मच्छिमारांमध्ये भीती, ज्वालामुखीचा संशय

दिल्लीनंतर आता मुंबईत उभारणार 'बिहार भवन'; जागा ठरली, ३० मजली इमारतीसाठी ३१४ कोटीही मंजूर

Kalyan : देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर रेल्वे सुरू; मलंगगडाची २ तासांची चढाई अवघ्या १० मिनिटांत, पहिले दोन दिवस मोफत प्रवास

स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेन एकमेकांना धडकल्या; २१ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती