लाईफस्टाईल

Republic Day Special: घरच्या-घरी बनवा आकर्षक तिरंगी ढोकळा, वाचा रेसिपी

केशरी, पांढरा आणि हिरवा रंग असलेला हा ढोकळा दिसायलाही आकर्षक आणि चवीला हलका असल्याने नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय ठरतो.

किशोरी घायवट-उबाळे

प्रजासत्ताक दिन म्हणजे देशभक्तीचा उत्साह आणि खास पदार्थांची मेजवानी. यंदा २६ जानेवारीनिमित्त नेहमीच्या ढोकळ्याला वेगळा ट्विस्ट देत तिरंगी ढोकळा तुम्ही बनवू शकता. केशरी, पांढरा आणि हिरवा रंग असलेला हा ढोकळा दिसायलाही आकर्षक आणि चवीला हलका असल्याने नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय ठरतो.

तिरंगी ढोकळ्यासाठी लागणारे साहित्य

  • बेसन

  • रवा

  • दही

  • ईनो/फळांचा मीठ

  • मीठ

  • साखर

  • हळद

  • पालक प्युरी

  • पाणी

  • तेल

  • मोहरी

  • कढीपत्ता

  • हिरव्या मिरच्या

पांढऱ्या ढोकळ्याची तयारीp

बेसन, रवा आणि दही एकत्र करून त्यात मीठ व थोडी साखर घालून पाणी टाकत गुळगुळीत मिश्रण तयार करा.

केशरी रंगासाठी

मिश्रणाच्या एका भागात हळद किंवा गाजर प्युरी घालून केशरी रंग तयार करा.

हिरव्या रंगासाठी

दुसऱ्या भागात पालकांची प्युरी किंवा कोथिंबीर-पुदिन्याची पेस्ट घालून हिरवा रंग तयार करा.

ढोकळा वाफवण्याची पद्धत

साच्याला तेल लावून सर्वात आधी केशरी मिश्रण ओता व थोडा वाफवा. त्यावर पांढरा आणि शेवटी हिरवा थर ओतत प्रत्येक थर हलकासा वाफवून घ्या. शेवटी पूर्ण ढोकळा १५-२० मिनिटे वाफवून घ्या.

फोडणी आणि सर्व्हिंग

तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्या. वरून ढोकळ्यावर ओता. खोबरे आणि कोथिंबीर घालून सजवा.

चव आणि आरोग्याचा संगम

तिरंगी ढोकळा कमी तेलात तयार होतो, हलका असल्याने आरोग्यदायी आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या थीमनुसार खास आकर्षण ठरतो.

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, दोन हजार सीसीटीव्हींची नजर

सरकारी शाळा बंदच्या धोरणाविरोधात धरणे; आझाद मैदानावर ५ ऑक्टोबरपासून आंदोलन; सिंधुदुर्गातून ३००० जण सहभागी होणार

‘रेंट अ गरबा पार्टनर’ ॲपवर बंदी घाला; आमदार मेहतांची मागणी

वसंत डावखरे सीडी प्रकरणात मोठा निर्णय; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची मुक्तता

Bhayandar : आहारबंदीप्रकरणी तपोवन शाळेला अल्पसंख्याक आयोगाची नोटीस; शिक्षण विभागाचीही कारणे दाखवा नोटीस