रेस्टॉरंट स्टाईल गार्लिक राईस आता घरच्या घरी; 'या' सोप्या पद्धतीने बनवा टेस्टी रेसिपी  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

रेस्टॉरंट स्टाईल गार्लिक राईस आता घरच्या घरी; 'या' सोप्या पद्धतीने बनवा टेस्टी रेसिपी

भाज्या, अंडी आणि भाजलेल्या लसणाचा खास स्वाद यामुळे या भाताची चव नेहमीच्या फ्राईड राईसपेक्षा वेगळी लागते.

किशोरी घायवट-उबाळे

दररोजच्या जेवणात भाताचा प्रकार बदलायचा असेल आणि काहीतरी चटपटीत, हलके व स्वादिष्ट खायचे असेल, तर कोथिंबीर गार्लिक राईस हा उत्तम पर्याय आहे. भाज्या, अंडी आणि भाजलेल्या लसणाचा खास स्वाद यामुळे या भाताची चव नेहमीच्या फ्राईड राईसपेक्षा वेगळी लागते. विशेष म्हणजे हा पदार्थ अवघ्या २० मिनिटांत तयार होतो. चला तर मग जाणून घेऊया त्याची सोपी रेसिपी.

साहित्य :

  • १ वाटी शिजवलेला भात

  • ३ ते ४ बेबी कॉर्न

  • अर्धा कप फ्रेंच बीन्स

  • १ छोटा गाजर

  • २ अंडे

  • २ लसूण पाकळ्या

  • २ टेबलस्पून रिफाइंड तेल

  • १ टीस्पून व्हेजिटेबल ब्रॉथ पावडर

  • अर्धा टीस्पून साखर

  • चवीनुसार मीठ

  • चवीनुसार काळी मिरी

  • सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती :

१. भाज्या चिरून घ्या - गाजर, बीन्स आणि बेबी कॉर्न स्वच्छ धुऊन छोटे तुकडे करून घ्या. शिजवलेला भात आधीच तयार ठेवावा.

२. अंड्याचे स्क्रॅम्बल तयार करा - पॅनमध्ये अंडी फोडून हलक्या हाताने मिक्स करून शिजवून घ्या. तयार झालेली अंड्याची भुर्जी बाजूला काढा.

३. भाज्या परतून घ्या - त्याच पॅनमध्ये तेल गरम करून बारीक चिरलेला लसूण घाला. लसूण हलका सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत परता. त्यानंतर चिरलेल्या भाज्या घालून परतून घ्या.

४. मसाले घाला - भाज्यांमध्ये मीठ, काळी मिरी, ब्रॉथ पावडर आणि साखर घाला. सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्या.

५. भात मिसळा - आता शिजवलेला भात आणि तयार केलेले अंड्याचे स्क्रॅम्बल पॅनमध्ये घाला. मोठ्या चमच्याने हलक्या हाताने सर्व साहित्य टॉस करून घ्या.

६. बर्न्ट गार्लिकचा टच द्या - भाताला भाजलेल्या लसणाचा स्वाद व्यवस्थित लागला की गॅस बंद करा. वरून ताजी चिरलेली कोथिंबीर घालून सजवा.

टिप्स :

  • भात शक्यतो आधी शिजवून पूर्णपणे थंड झालेला वापरा, त्यामुळे तो चिकटत नाही.

  • लसूण जाळू नका. तो फक्त सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा.

  • भाज्या जास्त शिजवू नका, थोड्या क्रंची राहिल्यास भाताची चव अधिक खुलते.

  • भात पॅनमध्ये घातल्यानंतर जास्त वेळ शिजवू नका.

  • साखरेचे प्रमाण कमी ठेवले तरी चालेल, ती मसाल्याच्या चवीचा समतोल साधण्यासाठी वापरली आहे.

  • हा भात मंच्युरियन, चिली पनीर किंवा कोणत्याही आवडत्या ग्रेव्हीसोबत सर्व्ह करू शकता.

Mumbai : ॲॅक्वा मेट्रोतून ७.२ कोटी जणांचा प्रवास; वर्षभरात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

दूध उत्पादन २५ ते ३० टक्क्यांनी घटले; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

एअर इंडिया, अकासाचा प्रवास महागणार

महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्ण माघार; दुष्काळाचे संकट गडद, कोकण-गोव्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा