Shravan Special : अळूवडी करायची म्हणजे मोठा तामझाम? 'ही' सोपी रेसिपी ट्राय करा 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Shravan Special : अळूवडी करायची म्हणजे मोठा तामझाम? 'ही' सोपी रेसिपी ट्राय करा

श्रावणात घरच्या घरी बनवा खमंग आणि कुरकुरीत अळूवडी. कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा.

Mayuri Gawade

अळूवडी म्हटलं की अनेकांना मोठा तामझाम आणि तासन्‌तासांची मेहनत आठवते. त्यामुळे हा पदार्थ सणासुदीला किंवा निवांत वेळ असतानाच करायचा, असं अनेकांना वाटतं. पण अळूवडी करण्यासाठी फार मोठा घाट घालण्याची गरज नाही. योग्य पद्धत आणि सोपी रेसिपी फॉलो केली तर ही खमंग वडी झटपट तयार करता येते. श्रावणात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाली असेल, तर ही सोपी अळूवडीचा रेसिपी नक्की ट्राय करा..

साहित्य

  • ३-४ अळूची ताजी पाने

  • १ कप बेसन

  • २ चमचे तांदळाचे पीठ

  • २ चमचे चिंच-गुळाचा कोळ

  • २ चमचे पांढरे तीळ

  • १ चमचा आले-लसूण पेस्ट

  • हळद, तिखट, जिरे-धणे पूड, हिंग

  • गरम मसाला आणि चवीनुसार मीठ

  • तेल

कृती

सर्वप्रथम अळूच्या पानांच्या मागील बाजूच्या जाड शिरा लाटण्याने चपट्या करून घ्या. एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, मसाले, चिंच-गुळाचा कोळ, तीळ आणि आले-लसूण पेस्ट एकत्र करा. थोडे पाणी घालून घट्टसर लेप तयार करा.

सर्वात मोठे पान उलटे ठेवून त्यावर लेप लावा. त्यावर दुसरे पान ठेवून पुन्हा लेप लावा. अशा प्रकारे ३-४ पानांचे थर करून घट्ट रोल तयार करा. हा रोल १५-२० मिनिटे वाफवून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर त्याच्या गोल वड्या कापा आणि गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळा किंवा शॅलो फ्राय करा. तयार आहेत खमंग अळूवड्या!

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक; मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या कोटामधून घातल्या बेड्या

रत्नागिरीत पोलिसांची 'समुद्रभरारी'! QRT च्या १८ जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण; सागरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पोलीस दल सज्ज

परिवर्तन झाले असेल, तर देशात उजव्या शक्तींचे सरकार सत्तेत कसे आले? ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचा सवाल

Pune : निष्काळजीपणाचा बळी! ड्रेनेजच्या १५ फूट खोल खड्डयात पडून ज्येष्ठ नागरिकाचा करुण अंत, घटना CCTV मध्ये कैद

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी, व्हिडिओ लावल्यास १००० रु. दंड; थेट तुरूंगवासही, दक्षिण रेल्वेचा नवा नियम