Shravan Special Recipe : श्रावणात बनवा जाळीदार वरीचे घावन; उपवासासाठी झटपट आणि हलका पर्याय

श्रावणातील उपवासासाठी साबुदाणा खिचडी किंवा वडा खाऊन कंटाळा आला असेल, तर वरीचे तांदूळ आणि ओल्या नारळापासून बनवा मऊसूत जाळीदार घावन. झटपट रेसिपी जाणून घ्या.
Shravan Special Recipe : श्रावणात बनवा जाळीदार वरीचे घावन; उपवासासाठी झटपट आणि हलका पर्याय
Shravan Special Recipe : श्रावणात बनवा जाळीदार वरीचे घावन; उपवासासाठी झटपट आणि हलका पर्याय'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

श्रावणात उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी, वडा किंवा बटाट्याचे पदार्थ हमखास केले जातात. पण हेच पदार्थ वारंवार खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी उपवासाच्या ताटात काहीतरी वेगळं करून पाहा.

वरीचे तांदूळ आणि ओल्या नारळापासून तयार होणारे मऊसूत, जाळीदार घावन हा त्यासाठी एक छान पर्याय आहे. कमी तेलात तयार होणारा हा पदार्थ चटणी किंवा साजूक तुपासोबत खायला मस्त लागतो. चला, झटपट रेसिपी पाहूया.

Shravan Special Recipe : श्रावणात बनवा जाळीदार वरीचे घावन; उपवासासाठी झटपट आणि हलका पर्याय
Shravan Special Recipe : उपवासाचा नवा बेत! वाटीभर साबुदाण्यांपासून बनवा खुसखुशीत थालीपीठ; रेसिपी आताच नोट करा
Shravan Special Recipe : श्रावणात बनवा जाळीदार वरीचे घावन; उपवासासाठी झटपट आणि हलका पर्याय
श्रावणात उपवासासाठी बनवा कुरकुरीत फराळी चिवडा! साबुदाणा, मखाणे अन् शेंगदाण्याची भन्नाट चव

साहित्य

  • वरीचे तांदूळ - १ वाटी

  • ओलं खोबरं - अर्धी वाटी

  • हिरवी मिरची - २ ते ३

  • जिरे - अर्धा चमचा

  • मीठ - चवीनुसार

  • पाणी - आवश्यकतेनुसार

  • तूप किंवा तेल - भाजण्यासाठी

कृती

सर्वप्रथम वरीचे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याचे पीठ तयार करून घ्या. त्यात ओलं खोबरं, थोडं पाणी आणि मीठ घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या.

हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला. पीठ नेहमीच्या घावनाप्रमाणे थोडं पातळ असावं. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि जिरे घालून मिश्रण एकजीव करा.

आता तवा चांगला गरम करून त्यावर अगदी थोडं तूप किंवा तेल लावा. गरम तव्यावर पिठाची पळी कडेपासून मध्यभागी सोडत घावन पसरवा. अशा पद्धतीने घावनाला छान जाळीदार पोत येईल.

Shravan Special Recipe : श्रावणात बनवा जाळीदार वरीचे घावन; उपवासासाठी झटपट आणि हलका पर्याय
Shravan Special : उपवासाचा थकवा मिनिटांत होईल गायब; एनर्जी वाढवण्यासाठी प्या 'हे' खास ड्रिंक
Shravan Special Recipe : श्रावणात बनवा जाळीदार वरीचे घावन; उपवासासाठी झटपट आणि हलका पर्याय
Shravan Special Recipe : कणकेचा शिरा मऊ-लुसलुशीत कसा कराल? श्रावणासाठी नोट करून ठेवा ही सोपी रेसिपी

घावनावर झाकण ठेवून मंद ते मध्यम आचेवर एक-दोन मिनिटं शिजवा. गरजेनुसार दुसरी बाजूही हलकी भाजून घ्या.

गरमागरम जाळीदार घावन साजूक तूप किंवा उपवासाच्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा. उपवासाच्या नेहमीच्या पदार्थांपेक्षा हा प्रकार नक्कीच वेगळा आणि चविष्ट ठरेल.

logo
marathi.freepressjournal.in