Ai Generated Image
लाईफस्टाईल

घाईगडबडीत थोडं दुर्लक्ष झालं आणि दूध उतू गेलं; महिलांनो तुमच्यासोबतही असं घडतं? मग 'या' खास टिप्स तुमच्यासाठी

अनेक वेळा दूध गरम करण्यासाठी ठेवतो आणि थोडं जरी दुर्लक्ष झालं की दूध उतू जातं. महिलांनो तुमच्यासोबतही असं घडत असेल तर 'या' खास टिप्स तुमच्यासाठी आहेत एकदा वाचा...

Kkhushi Niramish

सकाळ असो की संध्याकाळ महिलांसाठी ही तारेवरची कसरत असते. जीवन आधीच धावपळीचं झाल्याने कमीत कमी वेळेत खूप जास्त काम करायचे असते. एकाच वेळी मुलांची शाळेसाठीची तयारी, स्वतः बाहेर कामावर जात असेल तर स्वतःचा आणि नवऱ्याचा डबा, सर्वांसाठी सकाळचा नाश्ता इत्यादी... तर संध्याकाळी देखील अशीच काही धावपळ असते. त्यामुळे अनेक वेळा दूध गरम करण्यासाठी ठेवतो आणि थोडं जरी दुर्लक्ष झालं की दूध उतू जातं. महिलांनो तुमच्यासोबतही असं घडत असेल तर 'या' खास टिप्स तुमच्यासाठी आहेत एकदा वाचा...

दूध गरम करण्याचे भांडे मोठे घ्या

दूध ज्या भांड्यात गरम करणार ते भांडे दुधाच्या क्वांटिटीपेक्षा किमान चार बोट मोठे असावे. त्यामुळे दूध गरम झाल्यानंतर उकळी फुटते तेव्हा वर येते. मात्र असे असले तरी भांडे मोठे असल्यामुळे ते उतू जात नाही.

दुधाच्या भांड्याच्या कडेला तेल किंवा तूप लावा

दुधाच्या भांड्याच्या कडेला तेल किंवा तूप लावा यामुळे दूध वर आल्यानंतर तेल किंवा तुपाला स्पर्श करून लगेच पुन्हा खाली जाईल. यामुळे दूध ऊतू जात नाही.

दुधाच्या भांड्यावर जाड लाकडी चमचा ठेवा

दूध गरम होत असताना दुधाच्या भांड्यावर जाड लाकडी चमचा ठेवा. यामुळे दूधाची वर आलेली साय या लाकडी चमच्याला स्पर्श करून तिथेच अडकेल. परिणामी दूध उतू जाणार नाही.

दुधाच्या भांड्यात मोठा स्टीलचा चमचा आडवा ठेवा

दूध गरम करताना एक मोठा स्टीलचा चमचा त्यामधे आडवा ठेवा. यामुळे अडथळा निर्माण होवून दूध उकळताना खूप वर येत नाही.

दुधात स्टीलची छोटी वाटी ठेवा

दूध तापवत असताना दुधात एक स्टीलची छोटी वाटी ठेवावी. यामुळे दूध उकळत असताना वाटीमुळे अडथळा निर्माण होवून खूप वर येणार नाही. तसेच उतू जाणार नाही.

दूध कायम मंद आचेवर उकळवा

दूध कायम मंद आचेवर उकळवा. यामुळे दूध हळू हळू गरम होईल आणि फेस नियंत्रित होवून दूध उतू जाणार नाही.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.)

NEET पेपरफुटी हे ‘घोर पाप’; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

बिर्ला यांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात; बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला आव्हान

मुंबईत दुसऱ्या दिवशीही जोरदार निदर्शने; आतापर्यंत ९०० जणांवर गुन्हे, ठाकरे गट कायदेशीर मदत देणार

CJP Protest : संघर्ष सुरूच राहणार; झुरळांनी व्यक्त केला निर्धार

Mumbai : धोकादायक इमारतींचे वीज-पाणी तोडणार; ‘म्हाडा’ची आक्रमक भूमिका, कारवाई करण्यासाठी दिले पत्र