झणझणीत आणि टेस्टी पेरी पेरी पनीर सँडविच; नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

झणझणीत आणि टेस्टी पेरी पेरी पनीर सँडविच; नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

Peri Peri Paneer Sandwich Recipe : पनीर, भाज्या आणि पेरी पेरी मसाल्याचा झणझणीत स्वाद यामुळे ही रेसिपी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडू शकते.

किशोरी घायवट-उबाळे

सकाळच्या नाश्त्यात काहीतरी झटपट, टेस्टी आणि पोटभर खायचे असेल तर पेरी पेरी पनीर सँडविच हा उत्तम पर्याय ठरू शकतो. पेरी पेरी फ्राईज अनेकांना आवडतात, पण त्याच मसाल्याचा वापर करून बनणारे हे पनीर सँडविचही तितकेच स्वादिष्ट लागते. पनीर, भाज्या आणि पेरी पेरी मसाल्याचा झणझणीत स्वाद यामुळे ही रेसिपी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडू शकते.

घरच्या घरी बनवा पेरी पेरी मसाला

बाजारातील मसाला वापरण्याऐवजी घरच्या घरी पेरी पेरी मसाला तयार केल्यास सँडविचची चव अधिक छान लागते. लाल तिखट, लसूण पावडर, ओरेगॅनो आणि दालचिनी यामुळे मसाल्याला खास फ्लेवर मिळतो.

साहित्य :

पेरी पेरी मसाल्यासाठी

  • २ टेबलस्पून लाल तिखट

  • १/२ टीस्पून काळे मीठ

  • १/४ टीस्पून दालचिनी पावडर

  • १ टीस्पून लसूण पावडर

  • १ टीस्पून आलं पावडर

  • १ टीस्पून ओरेगॅनो

  • १ टीस्पून पिठीसाखर

  • १/२ टीस्पून मीठ

सँडविचसाठी

  • २०० ग्रॅम पनीर

  • १/४ कप बारीक चिरलेली ढोबळी मिरची

  • १/२ कप कांदा

  • १/४ कप टोमॅटो

  • २ टेबलस्पून मेयॉनीज

  • १/२ टीस्पून चिली फ्लेक्स

  • १/२ टीस्पून काळी मिरी पावडर

  • चवीनुसार मीठ

  • ४ ब्रेड स्लाइस

  • बटर

कृती :

एका बरणीत लाल तिखट, काळे मीठ, दालचिनी पावडर, लसूण पावडर, आलं पावडर, ओरेगॅनो, पिठीसाखर आणि मीठ घालून व्यवस्थित हलवा. घरगुती पेरी पेरी मसाला तयार होईल.

एका बाऊलमध्ये ढोबळी मिरची, कांदा, टोमॅटो आणि मेयॉनीज घाला. त्यात चिली फ्लेक्स, काळी मिरी, चवीनुसार मीठ आणि तयार केलेला पेरी पेरी मसाला घालून सर्व साहित्य एकजीव करा.

पनीरचे छोटे तुकडे करून मिश्रणात घाला. अधिक चव हवी असल्यास चीज किंवा चिली गार्लिक सॉसही घालू शकता. ब्रेड स्लाइसवर बटर लावा. त्यावर तयार स्टफिंग पसरवून दुसरी ब्रेड स्लाइस ठेवा.

सँडविच ग्रिलरमध्ये किंवा तव्यावर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत भाजा. तयार सँडविच टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

टिप्स :

  • फ्रेश पनीर वापरा - सँडविच अधिक मऊ आणि चविष्ट लागण्यासाठी ताजे पनीर वापरणे उत्तम.

  • भाज्या बारीक चिरा - भाज्या बारीक चिरल्यास स्टफिंग व्यवस्थित मिक्स होते आणि सँडविच खाताना बाहेर पडत नाही.

  • चीज घालू शकता - अधिक चीजी फ्लेवरसाठी मोझरेला किंवा प्रोसेस्ड चीज वापरू शकता.

  • लोणी कमी वापरा - हेल्दी पर्यायासाठी बटरचा वापर कमी करा किंवा ब्राउन ब्रेड वापरा.

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

'जो भुकेला आहे त्याला द्या'; मुंबईतील तरुणाने जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी झोमॅटोवरून पाठवलं मोफत जेवण; Video

Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

टोल नाक्याच्या २० किमी परिसरात राहतात? आता NHAI चा डिजिटल लोकल पास मिळवा RajmargYatra App वरून, जाणून घ्या डिटेल्स