Freepik
लाईफस्टाईल

पोट बिघडलंय? 'हे' घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम

धावपळीच्या जीवनात अनेक वेळा पर्याय नसल्याने आपण बाहेरचे पदार्थ खातो. परिणामी त्याचा परिणाम कधी ना कधी आपल्या पोटावर होतो. विशेषतः सध्या उन्हाळा सुरू आहे. अशा वेळी तर निश्चितच बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडण्याचे प्रमाण जास्त असते. याशिवाय पाण्यातूनही पोटाला संसर्ग होऊ शकतो.

Kkhushi Niramish

धावपळीच्या जीवनात अनेक वेळा पर्याय नसल्याने आपण बाहेरचे पदार्थ खातो. परिणामी त्याचा परिणाम कधी ना कधी आपल्या पोटावर होतो. विशेषतः सध्या उन्हाळा सुरू आहे. अशा वेळी तर निश्चितच बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडण्याचे प्रमाण जास्त असते. याशिवाय पाण्यातूनही पोटाला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे पोटाला, जुलाब, हगवण, गॅस, अजीर्ण होणे असे आजार जडतात. अशा प्रकारे पोट बिघडल्यावर काही घरगुती उपाय केल्याने लगेच आराम मिळतो. जाणून घ्या काय आहे हे उपाय...

कोरा चहा पिणे

कोरा चहा हा औषधी असतो. पोट बिघडलेले असल्यास दूध आणि दुधाचे पदार्थ जसे की चहा, कॉफी आणि अन्य गोष्टी टाळाव्या. कारण दूध पचवण्याची शक्ती नसते. याऊलट कोरा चहा हा जुलाब किंवा हगवण या आजारांमध्ये लगेच आराम देतो.

लेमन टी

जेव्हा खूप जास्त प्रमाणात जुलाब होतात त्यावेळी लेमन टी पिणे खूपच उपयुक्त ठरते. हे जुलाब प्रतिबंध करण्यासाठी सुपरफास्ट औषध आहे. कोऱ्या चहात लिंबू पिळून लेमन टी तयार करता येतो.

लिंबू सरबत

पोटात अॅसिडिटी झाली असेल तर लिंबू सरबत हा त्यावर सर्वोत्तम घरगुती उपाय आहे. लिंबात जीवनसत्त्व सी असते. तसेच यामध्ये सायट्रिक अॅसिड असते. त्यामुळे अॅसिडिटीवर हे तातडीने प्रभावी औषध ठरते.

भाताची पेज किंवा पाणी

भाताची पेज हा पोट बिघडल्यामुळे आलेल्या अशक्तपणावर प्रभावी आहार आहे. यामुळे शरीरातील कमी झालेल्या पाण्याची मात्रा झपाट्याने पूर्ववत होते. तसेच अशक्तपणा कमी होतो. भात पाण्यात शिजत असताना वरवरचे पाणी काढायचे असते. हे पाणी खूपच औषधी असते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

विधान परिषद निवडणुकीत ९९.०२ टक्के मतदान; २२ जूनला मतमोजणी

मुंबई महापालिकेतही ‘ऑपरेशन टायगर’? ठाकरे सेनेचे २० ते २५ नगरसेवक संपर्कात; BMCतील गटनेते अमेय घोले यांचा दावा

टेलिग्राम बंदीवरून राहुल गांधी यांचा मोदींवर निशाणा; पेपर लीक माफियांवर कारवाई करा

मुंबई विमानतळाबाहेरील ‘मातम’ व्हिडीओवरून नवा वाद

Mumbai : दहिसर-भाईंदर उन्नत मार्गावरून खडाजंगी; २ हजार कोटींच्या प्रकल्पाचा भार मुंबईकरांवर का?, स्थायी समितीत सदस्यांचा सवाल