लाईफस्टाईल

पावसात पोटदुखीचा त्रास वाढतोय? 'अशी' घ्या योग्य काळजी

पाऊस आला की त्याच्या पाठी आजारपण देखील येतं. स्किन इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, केस गळणे, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यांसारख्या आजारांसोबतच एक समस्या वारंवार समोर येते ती म्हणजे पोटदुखी. पावसाळ्यात वारंवार पोटदुखी होते. पण, पावसात नेमकी पोटदुखी कशाने होते? जाणून घेऊया कारणे.

नेहा जाधव - तांबे

पाऊस आला की त्याच्या पाठी आजारपण देखील येतं. स्किन इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, केस गळणे, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यांसारख्या आजारांसोबतच एक समस्या वारंवार समोर येते ती म्हणजे पोटदुखी. पावसाळ्यात वारंवार पोटदुखी होते. पण, पावसात नेमकी पोटदुखी कशाने होते? जाणून घेऊया कारणे.

१. कमकुवत प्रतिकारशक्ती -

पावसाळ्यात वातावरण बदलल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे विषाणू, बॅक्टेरिया यांचा संसर्ग सहज होतो आणि पोटदुखी, जंत संसर्ग होऊ शकतात. तणावामुळेही इम्युनिटीवर परिणाम होतो आणि पोटदुखीची तक्रार वाढू शकते.

२. दूषित पाणी -

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यात अशुद्धता येते. या पाण्यातील जंतू (बॅक्टेरिया, विषाणू, पॅरासाइट्स) पोटात गेल्यास पोटदुखी, जुलाब, उलटी होऊ शकते. झोपडपट्टी परिसरात ही समस्या अधिक तीव्र असते.

३. कमजोर पचनशक्ती -

पावसात आर्द्रता वाढते, त्यामुळे शरीराच्या पचनसंस्थेवर ताण येतो. पचन प्रक्रिया मंदावते, खाल्लेलं अन्न वेळेवर पचत नाही आणि त्यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी, अपचन आणि पोटदुखी होते.

४. शिळे किंवा खराब अन्न -

पावसात खाद्यपदार्थ पटकन खराब होतात. अशा अन्नपदार्थांचे सेवन केल्यास फूड पॉइजनिंग, पोटदुखी, ब्लोटिंग, उलटी, जुलाब यासारख्या समस्या उद्भवतात.

पोटात इन्फेक्शन असल्याची लक्षणं -

  • पोटात सूज

  • उलटी/मळमळ

  • खवखवीत ढेकर

  • गॅस/ब्लोटिंग

  • छातीत जळजळ

  • वारंवार जुलाब

पावसाळ्यात पोटदुखीपासून बचावाचे उपाय -

  • शुद्ध आणि उकळलेलं पाणी प्या.

  • स्वच्छता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

  • ताजं आणि घरचं अन्न खा. शिळे अन्न टाळा.

  • पचनासाठी हलकं जेवण विशेष करून सूप घ्या.

  • डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.

  • तणावापासून दूर राहा, पुरेशी झोप घ्या.

  • अतिसार, उलटी यांसारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली