जेवणात तोंडी लावायला झणझणीत भरलेली हिरवी मिरची; वरण-भाताची चव होईल दुप्पट 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
लाईफस्टाईल

जेवणात तोंडी लावायला झणझणीत भरलेली हिरवी मिरची; वरण-भाताची चव होईल दुप्पट

भरलेली मिरची विशेष म्हणजे जास्त दिवस टिकते. बनवताना पाणी न घातल्यास ती ४ ते ५ दिवस आरामात साठवता येते. चला तर जाणून घेऊया झटपट बनणारी ही चविष्ट रेसिपी.

Mayuri Gawade

रोजच्या जेवणात वरण-भात असला की मन तृप्त होतं. पण त्यासोबत काहीतरी झणझणीत, तोंडी लावायला असेल तर जेवणाची मजाच काही औरच असते. कायम त्याच त्या भाज्यांऐवजी एकदा भरलेली हिरवी मिरची करून पाहा. साधी, सोपी आणि जिभेवर दीर्घकाळ रेंगळणाऱ्या चवीची ही रेसिपी तुमच्या दुपारच्या जेवणाची मज्जा नक्कीच वाढवेल.

भरलेली मिरची विशेष म्हणजे जास्त दिवस टिकते. बनवताना पाणी न घातल्यास ती ४ ते ५ दिवस आरामात साठवता येते. चला तर जाणून घेऊया झटपट बनणारी ही चविष्ट रेसिपी.

साहित्य

  • हिरव्या मिरच्या

  • शेंगदाण्याचा कूट

  • बेसन

  • लाल तिखट

  • हळद

  • आलं-लसूण पेस्ट

  • मीठ (चवीनुसार)

  • धणे-जिरे पावडर

  • आमचूर पावडर

  • कोथिंबीर

  • तेल

  • चिमूटभर हिंग

कृती

सर्वप्रथम हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्या. प्रत्येक मिरचीला मध्ये उभी चीर देऊन आतल्या बिया काढून टाका. एका मोठ्या भांड्यात शेंगदाण्याचा कूट, बेसन, लाल तिखट, हळद, आलं-लसूण पेस्ट, मीठ, धणे-जिरे पावडर, आमचूर पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान मिक्स करा. या मिश्रणात पाणी अजिबात घालू नका. तयार मसाला मिरच्यांमध्ये भरगच्च भरा. तवा गरम करून त्यात तेल टाका आणि चिमूटभर हिंग घाला. त्यावर भरलेल्या मिरच्या हलक्या हाताने ठेवा. मंद आचेवर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या.

टिप

मिरच्या मंद आचेवरच भाजा, त्यामुळे मसाला छान शिजतो आणि मिरची बाहेरून कुरकुरीत तर आतून चवदार होते.

गरमागरम वरण-भात, भाकरी किंवा पोळी सोबत ही झणझणीत भरलेली हिरवी मिरची सर्व्ह करा. तोंडी लावायला केलेला हा पदार्थ जेवणाची चव नक्कीच दुप्पट करेल.

पुणे दारूकांडप्रकरणी २२ अधिकारी निलंबित; ५५ ठिकाणी छापे, ५० जण ताब्यात, बळींची संख्या २२

वाळूच्या वादळाचे राजस्थानात थैमान; ताशी ७० किमी वेगाचा झंझावात, विजेचे खांबही पडले, भरदुपारी अंधार

भिवंडीत ६ हजार लिटर मिथेनॉल जप्त

Jalna : जरांगेंचे उपोषण सुरू; सरकारवर दबाव

आजचे राशिभविष्य, ३१ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत