Drumstick Pickle : डायबिटीसवाल्यांसाठी बेस्ट! शेवग्याच्या शेंगांचं चटकदार लोणचं; १५ मिनिटांत रेडी...

कच्चा आंबा, लिंबू किंवा आवळ्याचे लोणचे आपण कित्येकदा खातो. पण जर अजून शेवग्याच्या शेंगांचे लोणचे चाखले नसेल, तर ते घरच्या घरी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार करता येतं.
डायबिटीसवाल्यांसाठी बेस्ट! शेवग्याच्या शेंगांचं चटकदार लोणचं; १५ मिनिटांत रेडी...
डायबिटीसवाल्यांसाठी बेस्ट! शेवग्याच्या शेंगांचं चटकदार लोणचं; १५ मिनिटांत रेडी...
Published on

लोणचे आवडत नाही असा माणूस क्वचितच सापडेल. पण आंबा किंवा लिंबाचे लोणचे जास्त झालं की गॅस, ॲसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी अशा एका वेगळ्या प्रकारचे लोणचे घेऊन आलो आहोत, जे चवीला अप्रतिम तर आहेच, पण आरोग्यासाठीही अत्यंत उपयोगी ठरतं. हे विशेष लोणचे म्हणजे शेवग्याच्या शेंगांचे लोणचे.

शेवगा म्हणजे पोषक तत्वांचा खरा खजिना! त्याच्या शेंगांत इतकी ताकद असते की जवळजवळ ३०० प्रकारच्या आजारांवर उपयोगी असल्याचं म्हटलं जातं. मधुमेह नियंत्रण, वजन कमी करणे, हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी तर हे शेंगचं लोणचे उत्तम मानलं जातं. शिवाय हाडांची मजबुती वाढवण्यातही शेवगा विशेष उपयोगी आहे.

कच्चा आंबा, लिंबू किंवा आवळ्याचे लोणचे आपण कित्येकदा खातो. पण जर अजून शेवग्याच्या शेंगांचे लोणचे चाखले नसेल, तर ते घरच्या घरी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार करता येतं.

चला तर मग, चव आणि आरोग्य यांचा सुंदर मेळ घालणारं हे खास लोणचे कसं बनवायचं ते पाहून घेऊया…

डायबिटीसवाल्यांसाठी बेस्ट! शेवग्याच्या शेंगांचं चटकदार लोणचं; १५ मिनिटांत रेडी...
वजन कमी करताय? 'हा' हेल्दी पालक-पनीर राइस तुमच्या डाएटसाठी परफेक्ट!

लागणारे साहित्य

  • शेवग्याच्या शेंगा

  • तेल - २ टेबलस्पून

  • पिवळी मोहरी - १ टीस्पून

  • हिंग - चिमूटभर

  • बडीशेप पूड -१/२ टीस्पून

  • हळद - १/४ टीस्पून

  • लोणचं मसाला - १ टेबलस्पून (तुमच्या आवडीनुसार)

  • लाल तिखट - १/२ टीस्पून (आवडीनुसार जास्त/कमी करा)

  • मीठ - चवीनुसार

  • गूळ किंवा साखर - १ टीस्पून (ऐच्छिक)

  • लवंग, काळीमिरी पावडर - चिमूटभर

  • पाणी - शिजवण्यासाठी थोडेसे

डायबिटीसवाल्यांसाठी बेस्ट! शेवग्याच्या शेंगांचं चटकदार लोणचं; १५ मिनिटांत रेडी...
Weight Loss Tips : सुटलेलं पोट कमी करायचंय? मग आहारात 'हे' पदार्थ घेणे टाळा

कृती

शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून मध्यम तुकडे करा आणि वरचा कच्चा भाग काढून टाका. उकळत्या पाण्यात थोडे मीठ टाकून हे तुकडे २-३ मिनिटे हलके शिजवा व पाणी निथळून बाजूला ठेवा. कढईत तेल गरम करून मोहरी, हिंग, बडीशेप पूड आणि हळद घालून परतवा; थोडा गूळ घालून वितळू द्या. त्यात लोणचं मसाला, लाल तिखट, लवंग–काळीमिरी पावडर आणि मीठ घालून मसाला नीट तेलात परता.

आता या मसाल्यात शिजवलेल्या शेंगा घालून हलक्या हाताने मिक्स करा. मिश्रण थंड झाल्यावर स्वच्छ बरणीत भरून ठेवा. तयार होतं १५ मिनिटांत चटकदार, टिकाऊ शेवग्याच्या शेंगांचं लोणचं!

टिपा आणि सर्व्हिंग

  • लोणचं थंड झाल्यावरच बंद डब्यात ठेवा

  • हे लोणचं एका आठवड्यापर्यंत रेफ्रिजरेटरमध्ये व्यवस्थित टिकते.

  • इच्छेनुसार हिरवी मिरची, लिंबाचा रस किंवा थोडे तेल जास्त घालून फ्लेव्हर बदलता येतो.

शेवग्याच्या शेंगा नियमितपणे आहारात समाविष्ट केल्यास पचन सुधारते, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते आणि हाडांची ताकद टिकून राहते. त्यामुळे हे लोणचं फक्त चवासाठी नाही, ते आरोग्यदायी निवडही आहे.

logo
marathi.freepressjournal.in