Photo : Pinterest
लाईफस्टाईल

कडू कारलं न खाणारे देखील आवडीने खातील; बनवा 'ही' स्पेशल रेसिपी!

तुम्हालाही कारल्याची भाजी खायला आवडत नसेल, तर ही मसालेदार गावराण स्टाईलमध्ये भरलेली कारली नक्की ट्राय करा आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी!

Mayuri Gawade

कारल्याची भाजी म्हंटलं की, “कडू आहे, नाही आवडत” असं म्हणत नाक मुरडणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण कारलं हे फक्त चवीसाठी नाही, तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवायला मदत होते, पचन सुधारते आणि पोटासाठी उपयोगी आहे. जर तुम्हालाही कारल्याची भाजी खायला आवडत नसेल, तर ही मसालेदार गावराण स्टाईलमध्ये भरलेली कारली नक्की ट्राय करा आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी!

साहित्य :

  • कारली - ६ ते ८ मध्यम आकाराची

  • कांदा - २ (बारीक चिरलेले)

  • शेंगदाण्याची पूड - ३ टेबलस्पून

  • नारळाचा कीस (कोरडा) - २ टेबलस्पून

  • धणे-जिरे पूड - २ टीस्पून

  • लाल तिखट - 1 टीस्पून

  • हळद - ½ टीस्पून

  • आमचूर पावडर / चिंचेचा कोळ - चवीनुसार

  • गूळ - १ ते २ टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • तेल - ३ ते ४ टेबलस्पून

  • मोहरी, हिंग - फोडणीसाठी

  • कोथिंबीर - सजावटीसाठी

कृती :

सर्वप्रथम कारली स्वच्छ धुवून पुसून घ्या. प्रत्येक कारल्याला मध्ये उभी चीर देऊन आतील बिया काढा. त्यावर थोडं मीठ चोळून २० ते ३० मिनिटं बाजूला ठेवा. नंतर कारली पाण्याने धुवून हलक्याच पिळून घ्या, यामुळे कडूपणा कमी होतो. एका कढईत थोडं तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर शेंगदाण्याची पूड, कोरडा नारळ, धणे-जिरे पूड, हळद, लाल तिखट, आमचूर पावडर, गूळ आणि चवीनुसार मीठ घालून मसाला नीट परतून घ्या. हा मसाला थंड झाल्यावर तो प्रत्येक कारल्यात नीट भरून घ्या. मसाला बाहेर येऊ नये म्हणून हवे असल्यास कारली हलक्या दोऱ्याने बांधू शकता. आता कढईत तेल गरम करून मोहरी टाका. मोहरी फुटल्यानंतर हिंग घालून भरलेली कारली कढईत ठेवा. झाकण ठेवून मंद आचेवर १५-२० मिनिटं कारली शिजवा, मध्येच हलक्या हाताने उलटवा. कारली मऊ आणि छान सोनेरी रंगाची झाली की गॅस बंद करा. वरून कोथिंबीर भुरभुरवून गरमागरम चपाती, भाकरी किंवा वरण-भातासोबत सर्व्ह करा.

टिप्स :

  • कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी उभ्या चिरीत मीठ लावून थोडा वेळ ठेवा.

  • मसाला नीट परतल्यावरच कारलीत भरा, त्यामुळे चव जास्त रुचकर लागते.

  • हलक्या आचेवर झाकण ठेवून शिजवल्यास कारली मऊ व सोनेरी होते.

  • गूळ घालल्यास कडूपणा कमी होऊन गोडसर मसाल्याची चव येते.

Delhi Riots 2020 : गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा हत्येप्रकरणी माजी AAP नगरसेवक ताहीर हुसेनला जन्मठेप

Bhiwandi Building Collapse : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक; मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

August 2026 Dry Days : ऑगस्टमध्ये पार्टीचा प्लॅन करताय? 'या' २ दिवशी बंद राहणार दारूची दुकाने

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! जादा सामानासाठी आता रांगेत उभं राहायची गरज नाही; जाणून घ्या नवे नियम