Freepik
लाईफस्टाईल

चेहरा होईल उन्हाळ्यातही चमकदार; या तीन ज्यूसचे करा नियमित सेवन

उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेचा त्रास होतो. तसेच कडक उन्हात फिरल्याने त्वचेचे नुकसान होते. काळजी नका करू इथे आम्ही तुम्हाला अशा तीन ज्यूसची माहिती देत आहोत जे तुम्हाला फक्त उन्हाळ्यात शरिराला गारवाच देणार नाही. तर तुमच्या त्वचेला आतून पोषण देतील. तुमची त्वचा चमकदार होईल.

Kkhushi Niramish

उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेचा त्रास होतो. तसेच कडक उन्हात फिरल्याने त्वचेचे नुकसान होते. काळजी नका करू इथे आम्ही तुम्हाला अशा तीन ज्यूसची माहिती देत आहोत जे तुम्हाला फक्त उन्हाळ्यात शरिराला गारवाच देणार नाही. तर तुमच्या त्वचेला आतून पोषण देतील. तुमची त्वचा चमकदार होईल.

काकडी आणि पुदिन्याचा ज्यूस

उन्हाळ्यात बाजारात काकडी आणि पुदिना सहज उपलब्ध असतात. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी हे दोन्ही प्रभावी आहेत. काकडी आणि पुदिन्याचा ज्यूस त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतो. काकडी त्वचेला हायड्रेट करते आणि थंड करते. पुदिना त्वचेशी संबंधित जळजळ कमी करण्यास मदत करते. उन्हाळ्यात तुम्ही दररोज काकडी आणि पुदिन्याचा ज्यूस पिऊ शकता.

ज्यूस बनवण्याची पद्धत

काकडी सोलून चिरून घ्या. त्यात मूठभर ताजी पुदिन्याची पाने घाला. दोन्हीही चांगले धुवा. आता काकडी आणि पुदिना मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घ्या. चव वाढवण्यासाठी तुम्ही थोडे लिंबू आणि मीठ घालू शकता. यामुळे शरीर हायड्रेट राहील आणि त्वचा चमकदार होईल.

आवळा आणि कोरफडीचा रस

आवळा हा व्हिटॅमिन सीचा एक शक्तिशाली स्रोत आहे. जो त्वचेला चमकदार आणि तरुण ठेवतो. तर कोरफड त्वचेला आतून स्वच्छ करते आणि ती चमकदार बनवते. कोरफड केस आणि त्वचा दोन्हीसाठी फायदेशीर मानली जाते.

असे बनवा ज्यूस

दोन चमचे आवळ्याचा रस दोन चमचे कोरफडीच्या रसात मिसळा. आता या मिश्रणात एक ग्लास पाणी घाला. चवीसाठी तुम्ही थोडे मध देखील घालू शकता. सकाळी रिकाम्या पोटी आवळा आणि कोरफडीचा ज्यूस पिणे अधिक फायदेशीर आहे.

गाजर आणि बीटरूटचा ज्यूस

गाजर आणि बीट हिवाळ्यात सहज उपलब्ध असतात, तरी बीट उन्हाळ्यात देखील उपलब्ध असते. तर केशरी रंगाचे गाजर उन्हाळ्यातही उपलब्ध असते. बीट रक्त शुद्ध करते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते. गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए असते, जे त्वचेचा रंग उजळवते.

ज्यूस बनवण्याची कृती

एक गाजर आणि अर्धा बीट घ्या. दोन्हीही चांगले धुवा आणि त्यांचे लहान तुकडे करा. आता मिक्सर किंवा ज्युसरमध्ये थोडे पाणी घालून बारीक करा. हे मिश्रण गाळून रस काढा आणि त्यात थोडा लिंबाचा रस घाला. गाजर आणि बीटाचा ज्यूस तयार आहे. या ज्यूसचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होईल आणि त्वचेचा रंग सुधारेल.

या ज्यूसचे सेवन कधी करावे?

आवळ्याचा असो किंवा बीटरूटचा ज्यूस, योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी सेवन केल्यानेच चांगले परिणाम मिळतात. ताज्या घटकांपासून ज्यूस बनवा. लक्षात ठेवा की ज्यूस तयार करून साठवू नका, तर फक्त ताजा ज्यूस प्या. नियमित सेवनाने लवकरच परिणाम दिसून येतील. अ‍ॅलर्जी किंवा कोणत्याही विशेष आरोग्य समस्येच्या बाबतीत, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ते घ्या.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल