आंब्याच्या सीजनमध्ये घरच्या घरी बनवा गारगार 'मँगो मस्तानी', फारच सोपी रेसिपी 
लाईफस्टाईल

आंब्याच्या सीजनमध्ये घरच्या घरी बनवा गारगार 'मँगो मस्तानी', फारच सोपी रेसिपी

उन्हाळ्यात आंब्याचा सीजन सुरू झाला की गारगार पेयांची मजा काही औरच असते. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ‘मँगो मस्तानी’ कशी बनवायची, याची ही खास रेसिपी. आंब्याचा सिझन संपण्यापूर्वी ही थंडगार मँगो मस्तानी नक्की ट्राय करा.

Mayuri Gawade

उन्हाळा म्हटलं की आंबा आणि आंबा म्हटलं की त्यापासून बनणारे चविष्ट पदार्थ… सध्या बाजारात आंब्यांची रेलचेल पाहायला मिळते आहे. आंब्याचा रस, शेक, आमरस हे पदार्थ आपण नेहमीच खातो, पण याच आंब्यापासून बनणारं एक खास आणि हटके पेय म्हणजे ‘मँगो मस्तानी’. पुण्यात विशेष लोकप्रिय असलेलं हे थंडगार पेय एकदा चाखलं की पुन्हा पुन्हा खावंसं वाटतं.

मँगो मस्तानी हे आंब्याचा रस, आईस्क्रिम आणि सुकामेवा यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. बाहेर हे पेय थोडं महाग मिळत असलं, तरी अगदी कमी साहित्य वापरून तुम्ही ते घरच्या घरी सहज तयार करू शकता.

साहित्य

  • १ मोठा पिकलेला आंबा

  • २ स्कूप व्हॅनिला किंवा मँगो आईस्क्रिम

  • १–२ टेबलस्पून टुटी फ्रुटी

  • काजू, बदाम, पिस्ता (ड्रायफ्रुट्स)

  • थोडं दूध

  • बर्फ

कृती

सर्वप्रथम आंबा स्वच्छ धुवून त्याचा गर काढा. अर्ध्या आंब्याचा गर, थोडं दूध आणि बर्फ घालून मिक्सरमध्ये फिरवून गुळगुळीत रस तयार करा. उरलेल्या आंब्याचे छोटे तुकडे करून ठेवा.

आता एक उंच ग्लास घ्या. सर्वात खाली आंब्याच्या रसाचा थर लावा. त्यावर आईस्क्रिमचा एक स्कूप घाला. पुन्हा आंब्याचा रस घालून थर तयार करा. वरून आंब्याचे तुकडे, टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रुट्स टाका.

असं थर देत तयार केलेली ही गारगार मँगो मस्तानी लगेच सर्व्ह करा. उन्हाळ्यात पाहुण्यांसाठी किंवा कुटुंबासोबत एन्जॉय करण्यासाठी ही एक परफेक्ट डिश ठरते.

Mumbai : मंडपांना थर्ड पार्टी ऑडिट बंधनकारक; प्रति खड्डा दोन हजार दंड वसुली, BMC चा इशारा

नोकरी गेल्यास अमेरिकेतून बाहेर; ६० दिवसांचा सवलतीचा कालावधी रद्द करण्याची तयारी, ट्रम्प प्रशासनाचा H-1B व्हिसाबाबत कठोर पवित्रा

NSS विद्यार्थ्यांची 'निर्माल्य मुक्ती' मोहीम; प्लास्टिक-थर्माकोल वेगळे करून खताची निर्मिती

पुण्यातील १० दिवसांची दारूबंदी रद्द; उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर निर्णय मागे, गणेशोत्सवात केवळ दोनच दिवस निर्बंध

‘सर्वच न्यायालये बहुसंख्याकवादाकडे’; SC चे निवृत्त न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी व्यक्त केली चिंता