Sunday Special Recipe : बाजारासारखे क्रिस्पी चिकन पॉपकॉर्न आता घरीच, वाचा सोपी रेसिपी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Sunday Special Recipe : बाजारासारखे क्रिस्पी चिकन पॉपकॉर्न आता घरीच, वाचा सोपी रेसिपी

मसाल्यांचा परफेक्ट स्वाद आणि बाहेरून कुरकुरीत तर आतून रसाळ चिकन अशी ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.

किशोरी घायवट-उबाळे

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा घरातील छोट्या पार्टीसाठी काहीतरी झटपट आणि चविष्ट बनवायचे असेल, तर चिकन पॉपकॉर्न हा उत्तम पर्याय आहे. बाहेर मिळणाऱ्या क्रिस्पी चिकन पॉपकॉर्नची चव आता अगदी सहज घरीही मिळू शकते. मसाल्यांचा परफेक्ट स्वाद आणि बाहेरून कुरकुरीत तर आतून रसाळ चिकन अशी ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.

साहित्य :

  • २५० ग्रॅम बोनलेस चिकन

  • २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर किंवा मैदा

  • १ अंडे

  • १ कप ब्रेडक्रम्ब्स

  • पाऊण टेबलस्पून आले-लसूण पेस्ट

  • पाव टीस्पून मीठ

  • पाव टीस्पून काळी मिरी पूड

  • अर्धा टीस्पून कांदा पावडर (ऐच्छिक)

  • पाऊण टीस्पून लाल तिखट

  • तळण्यासाठी तेल

कृती :

एका भांड्यात लाल तिखट, काळी मिरी, आले-लसूण पेस्ट, मीठ आणि कांदा पावडर एकत्र मिसळा. बोनलेस चिकनचे छोटे समान आकाराचे तुकडे करून तयार मसाल्यात घालून चांगले मिक्स करा. मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये कॉर्नफ्लोअर किंवा मैदा घालून सर्व तुकड्यांना व्यवस्थित कोटिंग करा. यानंतर अंडे फेटून मिश्रणात घाला आणि चिकनला नीट लावून घ्या.

आता प्रत्येक तुकड्यावर ब्रेडक्रम्ब्स लावून सर्व बाजूंनी कोटिंग करा. कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल योग्य तापमानाला आल्यावर चिकनचे तुकडे एक-एक करून सोडा. सुरुवातीला एक मिनिट तुकड्यांना हलवू नका. नंतर हलक्या हाताने फिरवत सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

तळलेले चिकन पॉपकॉर्न टिश्यू पेपरवर काढा आणि टोमॅटो सॉस, मेयोनेझ किंवा आवडीच्या डिपसोबत गरमागरम सर्व्ह करा.

टिप्स :

  • चिकनचे तुकडे समान आकाराचे ठेवा, त्यामुळे ते एकसारखे शिजतात.

  • ब्रेडक्रम्ब्स लावल्यानंतर १०-१५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा, त्यामुळे कोटिंग निघत नाही.

  • तेल खूप गरम किंवा थंड नसावे; मध्यम तापमानावर तळल्यास पॉपकॉर्न अधिक कुरकुरीत होतात.

  • अधिक चवदार बनवण्यासाठी ब्रेडक्रम्ब्समध्ये ओरिगानो, चिली फ्लेक्स किंवा मिक्स हर्ब्स घालू शकता.

  • चीज डिप, गार्लिक मेयो किंवा स्पायसी सॉसबरोबर सर्व्ह केल्यास चव आणखी वाढते.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड