त्वचेवरील टॅनिंग कमी करा! १० रुपयांच्या बीटाने मिळवा नैसर्गिक गुलाबी ग्लो 
लाईफस्टाईल

त्वचेवरील टॅनिंग कमी करा! १० रुपयांच्या बीटाने मिळवा नैसर्गिक गुलाबी ग्लो

फक्त १० रुपयांचा बीट वापरून घरच्या घरी तयार करा नैसर्गिक फेसपॅक! टॅनिंग कमी करा, डाग दूर करा आणि चेहऱ्यावर मिळवा गुलाबी आणि तजेलदार ग्लो. सोपा, झटपट आणि नैसर्गिक उपाय त्वचेसाठी.

Mayuri Gawade

धूळ, प्रदूषण, ताणतणाव आणि बदलती जीवनशैली याचा परिणाम सर्वप्रथम आपल्या त्वचेवर दिसून येतो. त्यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो, टॅनिंग वाढते आणि मुरुमांचे डागही दिसू लागतात. अनेकजण या समस्यांवर महागडी क्रीम किंवा लोशन वापरतात. मात्र काही सोपे घरगुती उपाय त्वचेला नैसर्गिक चमक देण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात. त्यापैकी एक म्हणजे बीटाचा वापर.

बीटामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स, लोह आणि व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी चमक दिसू लागते. योग्य पद्धतीने बीटाचा फेसपॅक वापरल्यास डेड स्किन कमी होऊन त्वचेची पोत सुधारते.

1) बीट आणि कॉफी फेसमास्क

सर्वप्रथम बीट सोलून ते किसून घ्या आणि त्याचा रस काढा. या रसामध्ये थोडी कॉफी पावडर मिसळून फेसमास्क तयार करा. हा मिश्रण चेहऱ्यावर लावून काही मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील मृत पेशी कमी होण्यास मदत होते.

2) बीट आणि तांदळाच्या पिठाचा फेसपॅक

एका वाटीत बीटाचा रस घेऊन त्यात तांदळाचे पीठ मिसळा. हे मिश्रण चांगले एकजीव करून चेहऱ्यावर लावा. काही वेळानंतर हलक्या हाताने ४–५ मिनिटे मसाज करून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेसपॅक त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करतो.

बीटचे त्वचेसाठी फायदे

बीटामधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेतील अशुद्धता कमी करण्यास मदत करतात. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात आणि त्वचा अधिक स्वच्छ दिसते. तसेच डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठीही बीट उपयुक्त ठरते. नियमित वापर केल्यास त्वचा अधिक तजेलदार आणि निरोगी दिसू शकते.

तथापि, कोणताही फेसपॅक वापरल्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि तिचा ओलावा टिकून राहतो.

(Disclaimer : या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले हे केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची नवशक्ति पुष्टी करत नाही.)

Mumbai : गणपती विसर्जनासाठी उद्या कुठे वाहतूक बंद? लोकल, मेट्रो आणि पार्किंगबाबतही महत्त्वाचे अपडेट

बंगळुरूतील CEO ची मोठी घोषणा; "४ राज्यांतील पुरुषांना नोकरी देणार नाही", सोशल मीडियावर चर्चेला उधाण

ठाण्यातील क्लस्टर, पुनर्विकासाला गती; १५ वर्षांत ३० लाख घरांचे लक्ष्य, सिद्धेश्वर नगरचे काम तीन वर्षांत पूर्ण करणार

IIT Bombay Student Suicide Case : साहिल वाकोडेचे वडील पोलिसांच्या ताब्यात; उपोषणासाठी IIT बॉम्बेकडे जाताना रोखले

राज्यात ४७ नवीन अतिरिक्त तहसीलदार कार्यालये