आजच्या या वर्ल्ड केअरिंग डे निमित्ताने गार्गी बाय पीएनजीएसचे मालक आदित्य मोडक आणि अश्नामचे संस्थापक मनोजकुमार शर्मा यांनी काही उत्तम भेटवस्तूंचे पर्याय निवडले आहेत. ही भेटवस्तू प्रेम व कृतज्ञता दर्शवते. तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबतचे नाते अधिक घट्ट करायचे असेल तर हा लव्ह कनेक्शन नेकलेस (Love Connection Necklace) एक उत्तम भेटवस्तू आहे. रोझ गोल्ड पॉलिशमध्ये डिझाइन करण्यात आलेला हा नेकलेस प्रत्येक प्रेमाच्या खास नात्याला सादर करतो.
हा क्रेसेण्ट पर्ल नेकलेस (Crescent Pearl Necklace) कोणाला आवडणार नाही? चंद्रकोराच्या आकाराप्रमाणे डिझाइन करण्यात आलेला हा नेकलेस आजच्या काळातील स्टाईलला अनुरूप आहे. असे म्हणतात की, हिरे महिलांचे सर्वोत्तम सोबती आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला आकर्षक व सदाबहार डायमंड एव्हरीडे रिंग (Diamond Everyday Ring) गिफ्ट देऊ शकता. तुमच्या आवडत्या बॉस लेडीला हे कानातले गिफ्ट म्हणून द्या. हे तिच्या लुकला अधिक आकर्षक करतील. या डेअली-वेअर ब्रास इअररिंग्ज (daily-wear brass earrings) सर्वांचे लक्ष वेधून घेतात.तुम्हाला ज्यांना धन्यवाद बोलायचं आहे त्यांचा चिंतन व शांततेवर विश्वास असेल तर ही क्लासिक मेडिटेटिवह मोंक (Meditative Monk) फिगरिन त्यांच्यासाठी एक परिपूर्ण गिफ्ट आहे. हा पीस उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करतो, जे आध्यात्मिकतेसाठी अनुकूल आहे. कॉम्पॅक्ट जागा असलेल्यांसाठी ही उत्तम निवड आहे. जर तुमची आवडती व्यक्ती योगा किंवा फिटनेस प्रेमी असेल तर त्यांच्यासाठी ही मरमेड योगा पोज फिगरिन बेस्ट गिफ्ट आहे. तुमच्या आईला सकाळी लवकर उठून या मूर्तीकडे पाहिल्यानंतर उत्साही वाटेल.