लाईफस्टाईल

तुम्हालाही हिवाळ्यात दाढदुखीचा त्रास होतो?दाढदुखीवर 'हा' सोपा उपाय करा

दातांची योग्य काळजी न घेतल्यास दाढदुखीसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे दाढदुखीवर काय उपचार केले पाहिजे हे जाणून घ्या.

Rutuja Karpe

दातांची योग्य काळजी न घेतल्यास दाढदुखीसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे दाढदुखीवर काय उपचार केले पाहिजे हे जाणून घ्या.

  • खाल्ल्यानंतर प्रत्येक वेळी व्यवस्थित चूळ भरावी,

  • सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत.

  • खूपच थंड, गरम, कडक पदार्थाचे सेवन शक्यतो टाळावे

लहान मुलांना खूप गोड व चॉकलेट, तसेच अतिथंड पदार्थ देणे टाळावे, तसेच नियमित दात घासायला लावणे,

दाढदुखीवर सोपा उपाय ॥

तुळशीची ५ ते १० पाने स्वच्छ धुवून वाटीमध्ये किंवा छोट्या उखळीमध्ये घेऊन कुटून त्याचा रस निर्माण करावा आणि त्यात कापराच्या ३ ते ५ वड्या मिसळाव्यात, कापसाचे छोटे छोटे ३ ते ४ बोळे या मिश्रणात भिजवून दुखणाऱ्या दाढेत ठेवावेत. त्यामुळे दाढदुखी कमी होण्यास मदत होते,

दाढदुखीवर डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यावा. दाढ नेमकी का दुखते यावर योग्य उपचार घेणं आवश्यक आहे.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री