भारतीय हिंदू चांद्र अमांत कालगणनेनुसार वर्षाचा शेवटचा महिना फाल्गून हा आहे. लवकरच नवीन वर्ष सुरु होत आहे. महाराष्ट्रात चैत्र महिन्याची सुरुवात गुढी पाडवा सण साजरा करून होते. हा सण देशातील अन्य भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या शेजारील राज्य आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात हा सण उगाडी नावाने साजरा केला जातो. यंदा २०२५ मध्ये उगाडी ३० मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. जाणून घेऊ या उगाडी सण कसा साजरा करतात. काय आहे नावाचे महत्त्व...
उगाडी म्हणजे काय?
उगाडी हा शब्द संस्कृत शब्द 'युग' या शब्दापासून तयार झाला आहे. आदि म्हणजे सुरुवात. उगाडी म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. उगाडी हा सण चैत्र महिना सुरू झाल्याचे दर्शवतो. उगाडी हा सण निसर्गाला समरस होऊन साजरा केला जातो.
उगाडीला कडुलिंबाची पाने आणि गूळ खाण्याचे महत्त्व
उगाडी सणाला महाराष्ट्रातील गुढी पाडव्याप्रमाणेच कडुलिंबाची पाने आणि गूळ खाणे याला महत्त्व आहे. कडुलिंबाची पाने आणि गुळ खाणे शुभ मानले जाते. यामधून आयुष्यातील कटू अनुभव आणि गोड अनुभव दोन्ही समरसतेने कसे स्वीकारावे याचे महत्त्व सांगितले जाते. तसेच उगाडीला पचाडी नावाची एक खास डिश बनवली जाते. जाणून घेऊ ही डिश कशी करतात.
उगाडी पचडी म्हणजे काय?
उगाडी पचडी ही सहा घटकांपासून बनवलेली एक खास डिश आहे. प्रत्येक घटक जीवनाच्या वेगवेगळ्या भावना दर्शवतो.
कडुलिंबाची पाने - कटुता (दु:ख आणि आव्हाने)
गूळ - गोडपणा (आनंद आणि यश)
चिंच - आंबटपणा (अप्रिय अनुभव)
कच्चा आंबा - तिखटपणा (आश्चर्य आणि नवीन संधी)
मीठ - खारट चव (शक्ती आणि धैर्य)
मिरची/मिरपूड - तिखटपणा (राग आणि आक्रमकता)
ही डिश जीवन हे सर्व भावना आणि अनुभवांचे मिश्रण आहे याची आठवण करून देते, लोकांना संतुलित मानसिकतेने ते स्वीकारण्यास प्रोत्साहित करते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)