Freepik
लाईफस्टाईल

Vaastu Tips : सावधान! कोणाच्याही घरातून 'या' ३ वस्तू चुकूनही आणू नका; वास्तुशास्त्र सांगते...

अशी देवाण घेवाण नकळतपणे काही वस्तूंच्या बाबतीत आपल्याला महागात पडू शकते. आपल्याला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. भीषण गरिबी ओढावू शकते. तर कधी कधी संपूर्ण आयुष्य उद्धस्त होऊ शकते. जाणून घ्या कोणत्या आहेत या वस्तू काय सांगते (Vaastu Tips) वास्तुशास्त्र...

Kkhushi Niramish

आपण राहतो त्या ठिकाणी किंवा काम करतो त्या ठिकाणी अनेक वेळा आपण आपल्याकडे एखादी वस्तू नसल्यास तात्पूरती उसनी म्हणून ती शेजारच्यांकडून घेऊन येतो. तसेच अनेक वेळा आपण या वस्तू इतर कोणाला तरी देतो. अशी देवाण घेवाण दैनंदिन व्यवहारात चालूच असते. मात्र, अशी देवाण घेवाण नकळतपणे काही वस्तूंच्या बाबतीत आपल्याला महागात पडू शकते. आपल्याला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. भीषण गरिबी ओढावू शकते. तर कधी कधी संपूर्ण आयुष्य उद्धस्त होऊ शकते. जाणून घ्या कोणत्या आहेत या वस्तू काय सांगते (Vaastu Tips) वास्तुशास्त्र...

नकारात्मक ऊर्जेचा परिणाम

एखादी व्यक्ती ज्या वस्तू वापरतो त्या व्यक्तीच्या ऊर्जेचा त्या गोष्टींवर परिणाम होत असतो. जेव्हा एखाद्या वस्तूची मालकी बदलते तेव्हा तिची ऊर्जा देखील बदलते. म्हणूनच वास्तुनुसार, अशा कोणत्याही वस्तू तुमच्या घरात आणू नका ज्या कोणी वापरल्या असतील. त्यांच्या आगमनामुळे तुमच्यावर नकारात्मक उर्जेचा परिणाम होऊ शकतो.

वास्तुशास्त्रानुसार 'या' गोष्टी इतरांकडून आणू नये

जुने फर्निचर गरिबीला आमंत्रण

जुने फर्निचर ही अशी वस्तू आहे. ज्याचा त्या घरातील लोकांनी सर्वाधिक वापर केलेला असतो. अनेक वेळा कमी बजेटमुळे जुने फर्निचर खरेदी करतात. मात्र, यामुळे त्या लोकांच्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्यावर देखील होतो. जुने फर्निचर घरी आणून तुम्ही गरिबीला आमंत्रण देता. त्याच्या प्रभावामुळे घरात रोगराई येते, ज्यामुळे एक सुखी कुटुंबही उद्ध्वस्त होते.

एखाद्याचे जुने चप्पल किंवा बूट

शक्यतो आपण कधी कुणाचे जुने चप्पल किंवा बूट विकत घेत नाही. मात्र, असं अनेक वेळा होतो की आपण चुकून इतरांचे चप्पल किंवा बूट घालतो. तर कधी कधी एखादी डिझाइन आवडली म्हणूनही दुसऱ्यांच्या चपला घालतो. मात्र, लक्षात घ्या दुसऱ्यांच्या चपला आपल्या घरात आणल्याने किंवा आपल्या पायात घातल्याने त्या व्यक्तिची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते आणि ही ऊर्जा तुम्हाला त्रास देते. ते आयुष्यभर अडचणींची ठरते.

कोणाकडूनही छत्री घेऊ नका.

दुसऱ्याच्या घरून छत्री आणणे देखील अशुभ मानले जाते. असे केल्याने ग्रहांची स्थिती बिघडते. जर काही कारणास्तव तुम्हाला दुसऱ्याच्या घरून छत्री आणावी लागली तर ती घरात ठेवू नका. ते वापरा आणि शक्य तितक्या लवकर परत करा. अन्यथा, त्याचा तुमच्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका; मुंबईत आझाद मैदानाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आंदोलनाला मनाई, फक्त १ दिवसाची परवानगी

नौदलाची पाणबुडी बचाव क्षमता आणखी वाढणार; भारतीय नौदलात ‘निपुण’ युद्धनौका ३१ ऑगस्टला होणार दाखल

टिटवाळा स्थानकात १५ रात्रींचा पॉवर ब्लॉक; प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी लोकल प्रवाशांचे हाल

उत्तर प्रदेश, बिहार निवडणुकांवर डोळा ठेवून आंदोलन - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या CBI चौकशीची मागणी; सरकारने बैठक रोखली, संत-महंत संतप्त