लाईफस्टाईल

सुख-समृद्धीचे दरवाजे उघडणारा 'वास्तु पिरॅमिड'

भारतीय वास्तुशास्त्रानुसार घरात अनेक गोष्टी ठेवण्याला विशेष महत्त्व दिले जाते. त्यापैकीच एक म्हणजे 'वास्तु पिरॅमिड'.

नेहा जाधव - तांबे

भारतीय वास्तुशास्त्रानुसार घरात अनेक गोष्टी ठेवण्याला विशेष महत्त्व दिले जाते. त्यापैकीच एक म्हणजे 'वास्तु पिरॅमिड'. पिरॅमिड हा केवळ एक शोपीस नसून तो घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतो, नकारात्मकता दूर करतो आणि आनंद-समृद्धी वाढवतो असे मानले जाते.

पिरॅमिड का ठेवावा?

पिरॅमिडमध्ये विपुल ऊर्जा साठवलेली असते. त्यामुळे जर एखादी व्यक्ती थकलेली असेल आणि काही वेळ पिरॅमिडजवळ बसली, तर तिचा थकवा कमी होतो. पिरॅमिडमधून निर्माण होणारी सूक्ष्म कंपने मन शांत करतात, एकाग्रता वाढवतात आणि शरीरात नवचैतन्य निर्माण करतात.

कोणत्या धातूपासून बनवलेला पिरॅमिड योग्य?

  • चांदी, तांबे किंवा पितळ यांचे पिरॅमिड सर्वात शुभ मानले जातात.

  • लाकडाचा पिरॅमिडही ठेवू शकता.

  • परंतु, लोखंड, ॲल्युमिनियम किंवा प्लास्टिकचा पिरॅमिड टाळावा.

  • लक्षात ठेवा, पिरॅमिडचा केवळ फोटो लावून काही उपयोग होत नाही.

घरात पिरॅमिड कुठे ठेवावा?

  • वास्तुनुसार पिरॅमिड नेहमी ईशान्य दिशेला ठेवावा.

  • उत्तर किंवा दक्षिण दिशाही योग्य मानली जाते.

  • कुटुंबातील सदस्य ज्या खोलीत जास्त वेळ घालवतात, त्या ठिकाणी ठेवलेला पिरॅमिड अधिक प्रभावी ठरतो.

वास्तु पिरॅमिडचे ६ अमूल्य फायदे

१. नातेसंबंधात सुसंवाद - कुटुंबातील भांडणे, तणाव कमी होऊन एकमेकांशी प्रेम आणि सुसंवाद वाढतो.

२. संपत्तीच्या संधी - घरात सकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे नवी नोकरी, व्यवसाय किंवा पैशांची संधी मिळू शकते.

३. नकारात्मक ऊर्जा दूर करते - वास्तु दोष असलेल्या घरातही पिरॅमिड वातावरण शुद्ध करतो.

४. चांगले आरोग्य राखतो - मुलांच्या एकाग्रतेत आणि कुटुंबाच्या आरोग्यात सुधारणा होते.

५. समृद्धी आणि प्रगती - वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात यश व प्रगती मिळते.

६. भौगोलिक ताण कमी होतो - घराच्या जागेवर असलेला कोणताही नकारात्मक भौगोलिक प्रभाव कमी करण्यात मदत करतो.

नवीन घर बांधताना किंवा जुन्या घरात सकारात्मकता वाढवण्यासाठी वास्तु पिरॅमिड हा एक सोपा आणि किफायतशीर उपाय ठरू शकतो. योग्य ठिकाणी ठेवलेला हा पिरॅमिड घरातील वातावरण आनंदी, ऊर्जावान आणि संतुलित करतो.

Mumbai : पाणी टँकरचालकांचा उद्यापासून संप; बडे टॉवर, कार्यालये यांना फटका बसण्याची भीती

खिशाला कात्री! केस कापण्यापासून दाढीपर्यंत सर्व महागले; नवे दर जाणून घ्या

Navi Mumbai : "कित्येक रात्री झोपलेच नाही" म्हणत महिलेचा उद्रेक; रात्रीच्या वीजखंडितीने नागरिक त्रस्त, Video

स्वयंपाकाचा गॅस पुन्हा महागला; सिलिंडरच्या किंमतीत २९ रुपयांची वाढ, तुमच्या शहरातील दर किती?

MPSC च्या गुणवंताना खासगी नोकरीची संधी; UPSC च्या धर्तीवर निर्णय