Summer Care Tip: डिहायड्रेशन झाले तर आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात. यात थकवा येणे, भोवळ , डोकेदुखी आणि आकलनक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. किंबहुना, संशोधनातून असेही दिसून आले आहे की, थोड्याशा डिहायड्रेशनमुळेसुद्धा आकलनक्षमतेवर प्रभाव पडतो. परिणामी, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि वृत्तीवरही परिणाम होतो. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया (असोचॅम) या संस्थेने अलीकडेच प्रकाशित केलेल्या अहवालात भारतातील मनुष्यळाला डिहायड्रेशनमुळे थकवा येत आहे. त्यामुळे उत्पादकतेवर परिणाम होत आहे. हे केवळ कामाबाबतच नाही तर तुमच्या व्यायामावर, लक्ष केंद्रीत करण्यावर आणि एकूणच आरोग्य कल्याणावर याचा परिणाम होतो. दररोज प्रत्येक पुरुषाने ३००० मिलि तर स्त्रीने २२०० मिलि द्रव पदार्थाचे सेवन पुरेसे असते, अशी शिफारस करण्यात येते. न्यूट्रिशन सायन्सITC लि. बी नॅचरलच्या हेड डॉ. भावना शर्मा यांच्याकडून सविस्तर जाणून घ्या.
हायड्रेट करणारे पदार्थ
आपल्या दिनचर्येमध्ये हायड्रेट करणारे पदार्थ आणि पेये समाविष्ट करणे हा हायड्रेटेड राहण्याचा एक उत्तम मार्ग आहे. लस्सी, नारळाचे पाणी(Tender coconut water benefits), फळांचा रस ही पारंपरिक भारतीय पेये रुचकर असतातच, त्याचप्रमाणे अत्यंत हायड्रेटिंग असतात.
या सगळ्यात नारळाचे पाणी सर्वाधिक नैसर्गिकपणे हायड्रेट करणारे आणि ताजेतवाने करणारे पेय आहे. या पोटॅशिअम, सोडियम यासारखे नैसर्गिकरित्या आवश्यक असलेले क्षार मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे लगेच ऊर्जा वाढते आणि घामावाटे जे इलेक्ट्रोलाइट्सची झीज होते ती लगेच भरून निघते. नारळाच्या पाण्यामुळे कोलेस्टरॉलच्या पातळीचे संतुलन राखले जाते, रक्ताली शर्करा कमी होते, त्वचा, केसांसाठी ते चांगले असते आणि असे अनेक फायदे आहेत. या व्यतिरिक्त, त्यातील नैसर्गिक गोडव्यामुळे साखरयुक्त पेयांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
कधी प्यावे नारळाचे पाणी?
दिवसातील कोणत्याही वेळी नारळाचे पाणी पिता येते. पण सकाळी किंवा व्यायाम केल्यानंतर नारळाचे पाणी पिण्याची शिफारस करण्यात येते. सर्व वयोगटातील व्यक्ती आणि मुलांनीही हे पाणी प्यायलेले चालते. फक्त ज्यांच्या शरीरातील पोटॅशिअमची पातळी जास्त असते किंवा मूत्रपिंडाचा आजार असला तर त्या व्यक्तींनी जास्त प्रमाणात नारळाचे पाणी पिताना काळजी घ्यावी. शहाळ्याचे पाणी प्रत्येकासाठीच सहज उपलब्ध होईल, असे नाही. त्यामुळे बी नॅचरल सारखे ब्रँड नारळाचे पाणी पॅकेज्ड स्वरुपात पेट बाटल्यांमधून उपलब्ध करून देत आहेत. यात साखर घातलेली नसते आणि कृत्रिम स्वादही समाविष्ट नसतो. त्यामुळे ते सुरक्षित असते आणि प्रवासात असताना ते सहजपणे सोबत बाळगता येते.
सुयोग्य हायड्रेशन हा चांगल्या मानसिक व शारीरिक कामगिरीचा आधारस्तंभ आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत याला अधिकच महत्त्व प्राप्त होते. संतुलित आहाराचा भाग म्हणून नारळाच्या पाण्याचा समावेश केल्याने दिवसभर शरीर हायड्रेटेड आणि ऊर्जायुक्त राहील याची खातरजमा होते.