Freepik
लाईफस्टाईल

Excessive Sweating: तुम्हाला जास्त घाम येतो? 'ही' असू शकतात कारणे

Summer Skin Care: घाम येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण काही लोकांना जास्त घाम येण्याची समस्या असते. यामागे काय कारणे असू शकतात.

Tejashree Gaikwad

Excessive Sweating Reasons: घाम येणे ही एक फारच सामान्य प्रक्रिया आहे. ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे. यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते आणि हे शरीराला थंड ठेवण्यासाठी आवश्यक असते. पण काही लोकांना सामान्य लेव्हलपेक्षा जास्त घाम येतो. यामुळे अनेकांना खूप त्रास होतो. जास्त घाम आल्याने अनेकांना लाजल्या सारखेही होते. जास्त घाम येण्याची कारणे कोणती आहेत हे जाणून घेऊयात.

जास्त घाम का येतो?

जेव्हा घामाच्या ग्रंथींवर नियंत्रण ठेवणाऱ्या नसा अतिक्रियाशील होतात, तेव्हा शरीराला तापमान नियंत्रित करण्याची गरज नसतानाही घाम येतो. या कारणामुळे काहींना जास्त घाम येऊ लागतो. जास्त घाम येणे या स्थितीला हायपरहाइड्रोसिस असं म्हणतात.

हायपरहायड्रोसिस आहेत दोन प्रकार

  • प्राथमिक हायपरहाइड्रोसिस यामध्ये, कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय घाम येतो. हे अनेकदा जास्त तणावामुळे होऊ शकते.

  • दुय्यम हायपरहाइड्रोसिस यामध्ये, संपूर्ण शरीरात घाम येणे सुरू होते आणि हे काही विशिष्ट कारणांमुळे होते. रजोनिवृत्ती, कर्करोग, पाठीच्या कण्याला दुखापत ही कारणे असू शकतात. जास्त घाम अनेकदा औषधांच्या दुष्परिणामांमुळे देखील होऊ शकते. यामध्ये काखेत, हाताला आणि पायाला जास्त घाम येतो.

या समस्येपासून कशी सुटका मिळवावी?

  • आपल्या आहाराकडे लक्ष द्या. मसालेदार अन्न, कॅफीन, अल्कोहोल हे पदार्थ घाम ग्रंथींना चालना देतात. यामुळे जास्त घाम येऊ शकतो. समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी जास्त पाणी, फळे आणि भाज्या खा, जे शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत करतात.

  • तुम्ही अँटीपर्स्पिरंट वापरू शकता. याचा नियमित वापर घाम ग्रंथींना रोखतो. रात्री झोपण्यापूर्वी हे लावून झोपा.

  • काखेत लावण्यासाठी बाजरात वाइप्स येतात. याचा वापर करून तुम्ही हायपरहाइड्रोसिसच्या समस्येला सामोरे जाऊ शकते.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत