लाईफस्टाईल

WhatsApp चे नवे धमाकेदार फीचर : आता कुठल्याही भाषेतील मेसेज सहज समजणार!

आता व्हॉट्सॲपवर आलेला कुठल्याही भाषेतील मेसेज समजून घेणं अगदी सोपं होणार आहे. कंपनीने नव्या मेसेज ट्रान्सलेट फीचरची घोषणा केली असून, यामुळे android आणि iphone दोन्ही यूजर्सची मोठी सोय होणार आहे.

Mayuri Gawade

आता व्हॉट्सॲपवर आलेला कुठल्याही भाषेतील मेसेज समजून घेणं अगदी सोपं होणार आहे. कंपनीने नव्या मेसेज ट्रान्सलेट फीचरची घोषणा केली असून, यामुळे android आणि iphone दोन्ही यूजर्सची मोठी सोय होणार आहे. या फीचरमुळे चॅनल अपडेट्स, ग्रुप चॅट्स किंवा वन-टू-वन मेसेजेसमधील मजकूर थेट आपल्या पसंतीच्या भाषेत ट्रान्सलेट करता येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही संपूर्ण प्रोसेस फक्त यूजरच्या मोबाईलवरच होणार असल्याने प्रायव्हसीला कोणताही धोका नाहीये. अगदी कंपनीलाही हे मेसेजेस पाहता येणार नाहीत.

व्हॉट्सॲपनं सांगितलं की, या फीचरमुळे भाषेचं बंधन संपून जगभरातील लोकांना एकमेकांशी सहज संवाद साधता येईल. मात्र, या फीचरचा फायदा घेण्यासाठी ॲपची नवी आवृत्ती (अपडेट) इन्स्टॉल करणं गरजेचं आहे.

ट्रान्सलेट फीचर युज कसं करायचं ?

हा फीचर वापरण्याची पद्धत अगदी सोपी आहे. कुठलाही मेसेज ट्रान्सलेट करायचा असेल तर त्या मेसेजवर लाँग प्रेस करा. त्यानंतर दिसणाऱ्या ट्रान्सलेट पर्यायावर टॅप करा आणि हवी ती भाषा निवडा. पहिल्यांदा वापरताना निवडलेली भाषा डाउनलोड करावी लागेल. एकदा सेटअप झाल्यावर हव्या त्या मेसेजचं भाषांतर लगेच पाहता येईल.

कोणकोणत्या भाषांना मिळणार सपोर्ट?

सध्या android फोनसाठी हे फीचर इंग्लिश, स्पॅनिश, हिंदी, पोर्तुगीज, रशियन आणि अरबी या भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. हळूहळू आणखी भाषांचा समावेश केला जाईल. iphone यूजर्ससाठी हे फीचर सुरुवातीपासूनच १९ भाषांसोबत येणार आहे. शिवाय अँड्रॉईडवर एक अतिरिक्त पर्याय दिला जाणार आहे ज्याद्वारे यूजर एखाद्या विशिष्ट चॅटसाठी ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन सुरू करू शकतील. त्यामुळे त्या चॅटमधील सर्व मेसेजेस आपोआप ट्रान्सलेट होतील आणि प्रत्येक मेसेज वेगळा ट्रान्सलेट करण्याची गरज भासणार नाही.

जगभरातील तब्बल ३ अब्जाहून अधिक व्हॉट्सॲप यूजर्ससाठी हे फीचर टप्प्याटप्प्याने रोलआउट करण्यात येत आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत