आरोग्यासाठी भाज्या खाणे खूप महत्त्वाचे आहे. पण, आजकाल बहुतेक लोक भाज्या बनवताना खूप तेल वापरतात, ज्यामुळे त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. काही भाज्या अश्या असतात ज्या उकडून खाल्याने फायदा होतो.
ब्रोकोली उकळून खाल्ल्यास अनेक फायदे होतात. यामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट घटक असतात, ज्याचा शरीराला फायदा होतो.
उकडून पालक खाणे देखील खूप फायदेशीर आहे. यामुळे त्यातील पोषक तत्व पूर्णपणे शरीरात पोहोचतात. बटाटा उकडून खाल्यास त्यातील कॅलरीज कमी होतात. तसेच अशाप्रकारे बटाटा खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे.मधुमेहाच्या रुग्णांसाठी उकडलेले बीन्स खाणे खूप फायदेशीर मानले जाते.