हिवाळा म्हणजे आपल्या केसांसाठी मोठा आव्हानाचा काळ. थंड हवेमुळे केस लवकर निस्तेज होतात, कोरडे पडतात आणि तुटतात. अनेक वेळा केसांमध्ये कोंडा येतो, चमक कमी होते किंवा केस सांभाळणे खूप कठीण होते. हे मुख्यत्वे थंड हवेमध्ये आर्द्रतेचा अभाव असल्यामुळे होते. त्यामुळे केस स्वाभाविकरीत्या कोरडे होतात आणि सहज तुटतात.
हिवाळ्यात केस गळण्यामागची कारणे:
थंड हवेमध्ये ओलावा कमी असतो, त्यामुळे केस कोरडे होतात.
गरम पाण्याने अंघोळ केल्यास केसांमधील नैसर्गिक तेल निघून जातो.
स्ट्रेटनर, कर्लिंग आयर्नसारखी गरम उपकरणे केस कोरडे करून तुटण्यास प्रवृत्त करतात.
वारंवार केस धुणेही त्यातील नैसर्गिक तेल नष्ट करते, ज्यामुळे केस कमजोर होतात.
हिवाळ्यात टाळाव्यात अशा चुका:
गरम पाण्याने अंघोळ करणे; त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा.
गरम उपकरणांचा जास्त वापर; शक्य असल्यास कमी प्रमाणात वापरा किंवा हेअर प्रोटेक्शन स्प्रे वापरा.
केस सतत धुणे; दोन-तीन दिवसांनी एकदा धुण्याचा नियम ठेवा.
केसांची काळजी घेण्यासाठी प्रभावी टिप्स :
हायड्रेशन: ग्लिसरिन, ह्यालुरोनिक ऍसिड असलेले मॉइश्चरायझिंग शॅम्पू व कंडिशनर वापरा. हे केसांना आवश्यक ओलावा देतात आणि शुष्कपणापासून वाचवतात.
कंडिशनिंग व मास्क: आठवड्यातून दोनदा खोलवर पोषण देणारा हेअर मास्क वापरल्यास केस घट्ट, मजबूत आणि मऊ राहतात.
केस झाकणे: थंड वाऱ्यापासून केस संरक्षित करण्यासाठी टोपी, स्कार्फ किंवा हेडस्कार्फचा वापर करा.
संतुलित आहार: प्रोटीन, व्हिटॅमिन E, झिंक यांचा पुरेपूर समावेश असलेला आहार केसांना मजबुती देतो.
केस मोकळे ठेवणे: केस घट्ट बांधल्यास किंवा नेहमी टायट स्टाइल केल्यास ताणामुळे केस तुटतात; शक्य असल्यास मोकळे ठेवण्याचा प्रयत्न करा.
या टिप्स फॉलो केल्यास हिवाळ्यात देखील केस दाट, मुलायम, चमकदार आणि तुटण्यापासून मुक्त राहतात. थंडीतही केसांची काळजी घेणे जितके सोपे आहे, तितकेच आवश्यक आहे.