गेल्या काही वर्षात मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड ऐवजी मेंस्ट्रुअल कप वापरण्याकडे महिलांचा कल वाढत चालला आहे. पर्यावरणपूरक, प्रदूषण मुक्त, वापरण्यास आणि कॅरी करण्यास सोपे, आरोग्याला उत्तम सर्वात महत्वाचे बजेट फ्रेंडली या वैशिष्ट्यांमुळे मेंस्ट्रुअल कप कप वापरण्यास महिलांकडून पसंती देण्यास येत आहे. सोशल मीडियातून याविषयी मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण करता येत आहे. तुम्हाला मेंस्ट्रुअल कप वापरायची इच्छा आहे. मात्र, भीती वाटते तर इथे मेंस्ट्रुअल कप वापरण्याची योग्य पद्धत दिली आहे एकदा पाहा.
योग्य साईज निवडा
मेंस्ट्रुअल कप हे तीन साईजमध्ये मिळतात. लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराचे गुलाबी किंवा पर्पल रंगाचे कप मिळतात. यासाठी प्रथम तुम्हाला तुमच्यासाठी योग्य ती साईज निवडायची आहे. तुम्हाला कोणत्या साईजचा कप लागू शकतो याचा अंदाज घेण्यासाठी महिला डॉक्टरांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
कप वापरण्यासाठी दिलेल्या पद्धतीचे निर्देश वाचा
या कप सोबत येणाऱ्या बॉक्सवर कप कसा वापरावा याची माहिती दिलेली असते. ती नीट वाचा. काही कंपनी कप गरम पाण्याने धुवून घेण्याचा सल्ला देतात. तर काही कंपनी थंड पाण्याने कप धुवून घेण्याचा सल्ला देता. त्याप्रमाणे प्रथम कप धुवून घ्या. त्यानंतर त्याचा एक भाग मधोमध दुमडा. नंतर योनी मार्गात व्यवस्थित इनसर्ट करा.
सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहा
यासंदर्भात मार्गदर्शनपर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये दाखवलेल्या स्टेप बारकाईने पाहून स्टेप बाय स्टेप फोलो करा. यानंतरही तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही एकदा महिला डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेऊ शकता.