संग्रहित चित्र  
महाराष्ट्र

१४ लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजनेचा लाभ, बँक खात्यात ५,२१६ कोटी जमा

Swapnil S

मुंबई : पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सहकार विभागामार्फत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात येत आहे. २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या १४ लाख ३८ हजार खातेदारांच्या बँक खात्यात ५,२१६ कोटी ७५ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. मात्र या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या ३३ हजार ३५६ कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही.

अशा पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. संबंधित बँकांनीही खातेदारांना या बाबत कळवावे, असे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत.

पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागाच्या २९ जुलै २०२२ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अंमलात आली.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत