महाराष्ट्र

राज्यातील २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोमय मुंडे, अर्चित चांडक, बाळासाहेब पाटील यांचाही समावेश

Maharashtra IPS Officers Transfer : राज्यातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश गुरुवारी राज्य सरकारने जारी केले.

Swapnil S

मुंबई : राज्यातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश गुरुवारी राज्य सरकारने जारी केले. यात नक्षलविरोधी मोहिमेचे नेतृत्व केल्याबद्दल शौर्यचक्र प्रदान करण्यात आलेले सोमय मुंडे आणि मार्च महिन्यात नागपूर हिंसाचार प्रकरणात जखमी झालेले अर्चित चांडक यांचाही समावेश आहे.

लातूर जिल्ह्यातील अधीक्षक सोमय मुंडे यांची छत्रपती संभाजी नगर येथे पोलीस उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे, तर नागपूर येथील उपायुक्त चांडक यांची अकोला येथे बदली करण्यात आली आहे.

अहिल्यानगरचे अधीक्षक राकेश ओला, सहाय्यक पोलीस महानिरीक्षक राज तिलक रोशन आणि सातारा येथील अधीक्षक समीर शेख यांच्या मुंबईत उपायुक्तपदी बदल्या करण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्ह्याचे अधीक्षक सोमनाथ घारगे यांची नियुक्ती अहिल्या नगर येथे, तर पुणे राज्य राखीव दलाचे आंचल दलाल यांची रायगडचे अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. कोल्हापूरचे अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर येथे उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. नांदेड येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची कोल्हापूरच्या अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. अकोल्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांची नागपूर येथील राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक म्हणून, तर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाच्या विशेष कृती दलाचे उपायुक्त मंगेश शिंदे यांची नागपूर लोहमार्ग येथे पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

शौर्यचक्र विजेते सोमय मुंडे यांचीही बदली

नक्षलविरोधी मोहिमेचे नेतृत्व केल्याबद्दल शौर्यचक्र प्रदान करण्यात आलेले सोमय मुंडे यांचीही बदली करण्यात आली आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची नाशिक ग्रामीण येथे, तर गडचिरोली येथील अभियानचे अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांची पालघर येथे बदली करण्यात आली आहे. सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल यांना पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात अधीक्षकपदी पाठवण्यात आले आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी

  1. राकेश ओला – अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक → मुंबई पोलीस उपायुक्त

  2. सोमनाथ घार्गे – रायगड पोलीस अधीक्षक → अहिल्यानगर पोलीस अधीक्षक

  3. आंचल दलाल – राज्य राखीव पोलीस बल, पुणे → रायगड पोलीस अधीक्षक

  4. महेंद्र पंडित – कोल्हापूर पोलीस अधीक्षक → ठाणे शहर पोलीस उपायुक्त

  5. योगेश गुप्ता – नांदेड नागरी सुरक्षाचे पोलीस अधीक्षक → कोल्हापूर पोलीस अधीक्षक

  6. बच्चन सिंग – अकोला पोलीस अधीक्षक → राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ४, नागपूर

  7. अर्चित चांडक – नागपूर शहर पोलीस उपायुक्त → अकोला पोलीस अधीक्षक

  8. मंगेश शिंदे – मुंबई आर्थिक गुन्हे शाखा → नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षक

  9. राजातिलक रोशन – मुंबईचे सहायक पोलीस महासंचालक → मुंबई पोलीस उपायुक्त

  10. बाळासाहेब पाटील – पालघर पोलीस अधीक्षक → नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक

  11. यतिन देशमुख – गडचिरोली अप्पर पोलीस अधीक्षक → पालघर पोलीस अधीक्षक

  12. सौरभ अग्रवाल – सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक → पुणे गुन्हे अन्वेषण अधीक्षक

  13. मोहन दहिकर – ठाणे पोलीस उपायुक्त → सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक

  14. विश्व पानसरे – बुलढाणा पोलीस अधीक्षक → राज्य राखीव पोलीस बल, अमरावती समादेशक

  15. निलेश तांबे – नागपूर गुन्हे अन्वेषण → बुलढाणा पोलीस अधीक्षक

  16. समीर शेख – सातारा पोलीस अधीक्षक → मुंबई पोलीस उपायुक्त

  17. तुषार दोषी – पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक → सातारा पोलीस अधीक्षक

  18. सोमय मुंडे – लातूर पोलीस अधीक्षक → संभाजीनगर परिमंडळ १ पोलीस उपायुक्त

  19. जयंत मीणा – पुणे दहशतवादविरोधी पथक → लातूर पोलीस अधीक्षक

  20. नितीन बगाटे – संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त → रत्नागिरी पोलीस अधीक्षक

  21. रितू खोकर – सांगली अप्पर पोलीस अधीक्षक → धाराशिव पोलीस अधीक्षक

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल