महाराष्ट्र

Video : जीवघेणा रील! येत नसतानाही 'ती' कार चालवायला गेली, रिव्हर्स घेताना एका चुकीमुळे थेट दरीत कोसळली; संभाजीनगरमधील घटना

Tejashree Gaikwad

23-year-old woman dies while filming reel: कार चालवता येत नसतानाही रील व्हिडिओ बनवण्याच्या मोहापायी एका २३ वर्षीय तरुणीला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. कार रिव्हर्स गिअरमध्ये असताना या मुलीने चुकून एक्सीलेटर जोरात दाबल्याने कार थेट दरीत कोसळली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

माहितीनुसार, सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील दौलताबाद भागातील निसर्गरम्य सुलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला. श्वेता दिपक सुरवसे (वय- २३, रा. हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर) आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे (वय- २५, रा. हनुमाननगर) हे दोघे टोयोटा इटिऑस कार क्रमांक एम. एच. २१ बी. एच. ०९५८ मधून सुलीभंजन परिसरात फिरण्यासाठी आले होते. दत्त मंदिरात दर्शन घेतल्यानंतर श्वेताने कार नीट येत नसतानाही कार चालवताना रील व्हिडिओ बनवूया असे म्हणत शिवराजला व्हिडिओ बनवण्यास सांगितले. कार रिव्हर्स गिअरमध्ये असताना, 'स्टेरिंग इकडे फिरवल्यावर गाडी कुठे जाईल' असे ती शिवराजला विचारत होती आणि गाडी मागे जात होती. तर, शिवराज व्हिडिओ बनवत गाडीसोबत चालत होता. त्याचवेळी श्वेताने चुकून एक्सीलेटर जोरात दाबला, अचानक गाडी वेगाने मागे जाऊ लागली आणि क्षणार्धात खोल दरीत कोसळली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

थेट दरीत कोसळली कार

शिवराज धाव घेत जोरजोरात क्लच...क्लच...क्लच...ओरडला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि कार थेट दरीत कोसळली. घटनेवेळी तेथे अनेक पर्यटकही उपस्थित होते आणि ब्रेक दाब, असे ओरडत होते असे समजते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरीतून कार बाहेर काढली आणि श्वेताला खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मंदिर परिसरात जर संरक्षण भिंत अथवा लोखंडी कठडे असते तर हा अपघात टळला असता, अशी सध्या चर्चा सुरू आहे. रील्सच्या मोहापायी तरुणीने नाहक जीव गमावल्यामुळे हळहळ देखील व्यक्त होत आहे.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था