Dharmesh Thakkar
महाराष्ट्र

नाशिकमध्ये प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज ताब्यात

Swapnil S

नाशिक : नाशिकच्या एका सराफा व्यापाऱ्यावर प्राप्तिकर विभागाकडून रविवारी छापा टाकण्यात आला. या छापेमारीत २६ कोटी रुपयांची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

३० तास चालली कारवाई

प्राप्तिकर विभागाची ही कारवाई सलग ३० तास चालली. नाशिक, नागपूर आणि जळगावमधील पन्नासहून अधिक प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. प्राप्तिकर पथकाने छापेमारी केली, त्यावेळी सोन्याच्या व्यापाऱ्याच्या एका खोलीत पाचशे रुपयांच्या चलनी नोटांचा खच आढळला. ही रक्कम मोजायला अधिकाऱ्यांना १४ तास लागले, तर जप्त केलेली रक्कम नेण्यासाठी प्राप्तिकर विभागाला सात कार बोलवाव्या लागल्या. या कारवाईत प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण २६ कोटींची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त केले.

प्राप्तिकर विभागाच्या पथकाने या सराफ व्यापाऱ्याची शहरातील विविध ठिकाणी असलेली कार्यालये, खासगी लॉकर्स, बँकांमधील लॉकर्सची तपासणी केली असून मनमाड व नांदगाव येथील त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करण्यात आली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस