महाराष्ट्र

पेण येथे वेगवेगळ्या अपघातात ३ तरुणांचा मृत्यू

पेण तालुक्यातील दादर गावातील तरुणाला टेम्पोने जोरदार धकड दिल्याने, तर डावरे गावातील तरुण हमरापूर येथे मोटारसायकलवरुन घसरून तसेच कांदळेपाडा येथील तरुण रेल्वेखाली आल्याने झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 3 तरुण जागीच ठार झाले.

Swapnil S

पेण : पेण तालुक्यातील दादर गावातील तरुणाला टेम्पोने जोरदार धकड दिल्याने, तर डावरे गावातील तरुण हमरापूर येथे मोटारसायकलवरुन घसरून तसेच कांदळेपाडा येथील तरुण रेल्वेखाली आल्याने झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 3 तरुण जागीच ठार झाले. सदर अपघातांमुळे पेण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

सदर अपघातांची सविस्तर माहिती अशी की, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी दादर गावातील हरेश धनाजी पाटील वय २०, रा.दादर, ता. पेण हा तरुण पोलीस भरती परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी गावाबाहेरील स्वामी परमानंद मठाकडे पायी चालत जात असताना टेम्पोने जोरात धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात डोक्याला मागील बाजूस जबर दुखापत होऊन या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद दादर सागरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४/२०२५ भादवी कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ व मोटार व्हीकल ऍक्ट १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुपारी हमरापूर गाव येथील मोरीवर डावरे गावातील विवेक विष्णुदास घरत वय-३८ रा. डावरे, ता. पेण हा मोटारसायकल वरून जात असताना गाडी रस्त्याकडेला स्लिप होऊन झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

तसेच रामवाडी रेल्वे ट्रॅकवर कांदळेपाडा गावातील निरंजन बाबुराव पाटील वय. २३, रा. कांदळेपाडा, ता. पेण हा रेल्वे खाली आल्याने झालेल्या जोरदार अपघातात मृत्युमुखी पडला. सदर घटनेची नोंद ११/२०२५ BSNS १९४ नुसार पेण पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

या अपघातामुळे पेण तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री