महाराष्ट्र

Maharashtra Budget 2025 : ‘लाडकी बहीण’साठी ३६ हजार कोटी; अर्थसंकल्पात तरतूद

महाराष्ट्र सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या ७,००,०२० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या ७,००,०२० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या भत्तावाढीबाबतची कोणतीही घोषणा महायुतीने केली नाही. याउलट सीएनजी आणि एलपीजी वाहनांवरील मोटार वाहन कर १ टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव नव्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून ठेवला आहे.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभा अधिवेशनात आपला ११वा राज्य अर्थसंकल्प मांडला. त्यांनी नवीन औद्योगिक धोरणाची घोषणा केली. याद्वारे ४० लाख कोटींची गुंतवणूक आणि ५० लाख रोजगार निर्माण करण्यावर भर दिला जाईल.

मुंबई महानगर प्रदेशाला वाढीचे केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार असून २०४७ पर्यंत त्याचे अर्थव्यवस्थेचे प्रमाण १.५ ट्रिलियन डाॅलर होईल. यासोबतच पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसऱ्या विमानतळाची घोषणा करण्यात आली.

सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३६ कोटींची तरतूद केली असली तरी लाभार्थ्यांसाठी भत्ता १,५०० वरून २,१०० करण्याच्या निवडणुकीपूर्वी महायुतीने दिलेल्या आश्वासनाबाबत कोणताही उल्लेख केला नाही.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक