पीटीआय
महाराष्ट्र

खड्डेमुक्तीसाठी सिमेंटचे रस्ते! ६००० किमी रस्त्यांसाठी ३७ हजार कोटींचा खर्च; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई, नाशिक, ठाणे, नाशिक महामार्गावरील रस्त्यांची चाळण झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झाडाझडती घेतल्यानंतर निदर्शनास आले. त्यानंतर राज्यातील सहा हजार किमी लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई, नाशिक, ठाणे, नाशिक महामार्गावरील रस्त्यांची चाळण झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झाडाझडती घेतल्यानंतर निदर्शनास आले. त्यानंतर राज्यातील सहा हजार किमी लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी ३६ हजार ९६४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

राज्यातील सहा हजार किमी रस्ते डांबरीकरण करण्यात येणार होते. आता हे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचा निर्णय घेतला आहे. डांबरीकरणासाठी यापूर्वी दिलेल्या मान्यतेनुसार २८ हजार ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. नव्या निर्णयामुळे सुधारित हायब्रिड ॲन्युईटी योजनेत शासनाच्या सहभागाची रक्कम २५८९ कोटी वाढली असून एकूण शासन सहभागाची रक्कम ११ हजार ८९ कोटीला मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या सहभागाची रक्कम ५८७५ कोटी इतकी वाढली आहे. सहा हजार कि.मी.चे रस्ते महामंडळाला १७.५ वर्षे कालावधीसाठी हस्तांतरीत होतील.

खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंटचे रस्ते

काँक्रीटचे रस्ते करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले होते. शिंदे यांच्या आदेशानंतर सहा हजार कोटींच्या निविदा प्रक्रिया राबवत वर्क ऑर्डर दिली. त्यानंतर कामेही सुरू झाली आहेत, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई, नाशिक महामार्गावरील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. १० दिवसांत मुंबई, नाशिक महामार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करा, असे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले. तर ९ ऑगस्ट रोजी ठाणे, नाशिक महामार्गावरील रस्त्यांची पाहणी शिंदे यांनी केली. यावेळी रस्त्यांवर खड्डे पडल्याचे आढळून आले. मुंबईप्रमाणेच राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

Maharashtra Rain : अतिवृष्टीग्रस्त २३ जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून मदत जाहीर; ३,२५८ कोटींची मंजूरी

मतदार यादीत गोंधळ! संभाजीनगरात ३६,००० डुप्लिकेट नावे; निवडणुका पुढे ढकला, विरोधी पक्षानंतर महायुतीच्या आमदाराची मागणी

Nandurbar : ऐन दिवाळीत भाविकांवर काळाचा घाला; चांदशैली घाटात भीषण अपघात, अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या ६ जणांचा मृत्यू

Pakistan-Afghanistan War : ३ खेळाडूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; पाकिस्तानला मोठा फटका बसणार?

Pakistan-Afghanistan War : युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून हवाई हल्ला; अफगाणिस्तानच्या ३ खेळाडूंचा मृत्यू