संग्रहित फोटो
महाराष्ट्र

सहा हजार किमी रस्त्यांसाठी ३७ हजार कोटींचा खर्च, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; रस्ते होणार टिकाऊ

मुंबई, नाशिक, ठाणे, नाशिक महामार्गावरील रस्त्यांची चाळण झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झाडाझडती घेतल्यानंतर निदर्शनास आले.

Swapnil S

मुंबई : मुंबई, नाशिक, ठाणे, नाशिक महामार्गावरील रस्त्यांची चाळण झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झाडाझडती घेतल्यानंतर निदर्शनास आले. त्यानंतर राज्यातील सहा हजार किमी लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी ३६ हजार ९६४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

राज्यातील सहा हजार किमी रस्ते डांबरीकरण करण्यात येणार होते. आता हे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचा निर्णय घेतला आहे. डांबरीकरणासाठी यापूर्वी दिलेल्या मान्यतेनुसार २८ हजार ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. नव्या निर्णयामुळे सुधारित हायब्रिड ॲन्युईटी योजनेत शासनाच्या सहभागाची रक्कम २५८९ कोटी वाढली असून एकूण शासन सहभागाची रक्कम ११ हजार ८९ कोटीला मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या सहभागाची रक्कम ५८७५ कोटी इतकी वाढली आहे. सहा हजार कि.मी.चे रस्ते महामंडळाला १७.५ वर्षे कालावधीसाठी हस्तांतरीत होतील.

खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंटचे रस्ते

काँक्रीटचे रस्ते करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले होते. शिंदे यांच्या आदेशानंतर सहा हजार कोटींच्या निविदा प्रक्रिया राबवत वर्क ऑर्डर दिली. त्यानंतर कामेही सुरू झाली आहेत, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई, नाशिक महामार्गावरील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. १० दिवसांत मुंबई, नाशिक महामार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करा, असे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले. तर ९ ऑगस्ट रोजी ठाणे, नाशिक महामार्गावरील रस्त्यांची पाहणी शिंदे यांनी केली. यावेळी रस्त्यांवर खड्डे पडल्याचे आढळून आले. मुंबईप्रमाणेच राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी