महाराष्ट्र

ताम्हिणी घाटात वऱ्हाडाची बस उलटून ५ ठार, २७ जखमी

रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात वऱ्हाड घेऊन जाणारी एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात शुक्रवारी पाच जण ठार झाले, तर अन्य २७ जण जखमी झाले.

Swapnil S

मुंबई : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात वऱ्हाड घेऊन जाणारी एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात शुक्रवारी पाच जण ठार झाले, तर अन्य २७ जण जखमी झाले.

पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथून वऱ्हाड घेऊन जाणारी ही बस महाडमधील बिरवाडी येथे जात होती. एका वळणावर बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ती उलटली. त्यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिला असे पाच जण ठार झाले, तर अन्य २७ जण जखमी झाले. त्यांना माणगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेत ठार झालेल्यांची नावे संगीता जाधव, गौरव दराडे, शिल्पा पवार आणि वंदना जाधव अशी आहेत, तर पाचव्या मृत प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नाही.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत