महाराष्ट्र

गोंदियाजवळ रेल्वे अपघातात ५० प्रवासी जखमी; जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु

कोठी एक्सप्रेस छत्तीसगडच्या बिलासपूरहून राजस्थानमधील भगत की कोठीकडे जात होती

वृत्तसंस्था

विलासपूरहून राजस्थानमधील भगत की कोठीकडे जाणाऱ्या ‘भगत की कोठी’ एक्सप्रेसचा गोंदिया शहराजवळ अपघात झाल्याची घटना घडली. समोरुन येणाऱ्या मालगाडीला या एक्सप्रेसने धडक दिली. मध्यरात्री अडीच वाजता हा अपघात घडला. या अपघातानंतर या ट्रेनचा एक डब्बा रुळाखाली घसरला असून ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर गोंदियातील जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार भगत की कोठी एक्सप्रेस छत्तीसगडच्या बिलासपूरहून राजस्थानमधील भगत की कोठीकडे जात होती. गोंदिया स्थानकाजवळ ही गाडी आली असता सिग्नल न मिळाल्यामुळे समोरुन येणाऱ्या मालगाडीवर ही एक्सप्रेस आदळली. या अपघातानंतर एक्सप्रेस एस-३ डबा रुळावरून घसरला. या धडकेनंतर रेल्वेमधील ५० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. काहींच्या हाताला, पायाला, छातीला तर काहींना डोक्याला इजा झाली आहे. यापैकी ३ प्रवासी गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

इतर सुखरुप प्रवाशांना सकाळी पावणे आठ वाजता दुसरी रेल्वे भगत की कोठीकडे रवाना करण्यात आली. अपघातग्रस्त रेल्वेडबा रुळावरून उचलण्यात आला असून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड