Hp
महाराष्ट्र

नाशिक टोल तोडफोड प्रकरणी मसनेच्या ८ पदाधिकाऱ्यांना अटक ; मंत्री दादा भूसे म्हणाले, "कायदा..."

नवशक्ती Web Desk

समृद्दी महामार्गावरील नाशिकच्या गोंदे टोलनाका तोडफोड प्रकरणी टोल प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरुन मनसेच्या १२ ते १५ अज्ञात कार्यकर्त्यांवर वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पोलिसांनी रात्रितून मनसेच्या ८ ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यात विद्यार्थी सेना पदाधिकारी आणि राज्य कार्यकारणी सदस्यांचा समावेश आहे. इतर संशयितांचा नाशिक ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र तथा अमित ठाकरे हे यांचे नाशितच्या गोंदे टोल नाक्यावर वाहन अडवल्याच्या निषेधार्थ शनिवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी लाकडी दांडके, लोखंडी रॉडने टोलक्यावरील बुथची मोठ्या प्रणानावर तोडफोट करत नासधूस केली होती. यात कॅबिन, कॉम्प्युटर साहित्य आणि इतर उपकरणांचे ४ ते ५ लाखांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत होतं. यानंतर टोल प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरुन मनसेच्या १२ ते १५ अज्ञात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पोलिसांनी रात्रीतून मनसेच्या ८ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली असून इतर संशयीतांचा शोध सुरु आहे. या प्रकरणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भूसे यांनी या प्रकरणार भाष्य करताना कायदा सर्वांसाठी एकचं असल्याचं म्हटलं होतं.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस