(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

मुंबईतील विधानसभा जागांचा तिढा ९९ टक्के सुटला, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली माहिती; मुंबईत शिवसेना मोठा भाऊ - आव्हाड

मुंबईतील ३६ मतदारसंघांतील ९९ टक्के जागांचा तिढा सुटला असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली, तर मुंबईत शिवसेना हा मोठा भाऊ आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून निवडून येणाऱ्या उमेदवाराला तिकीट देण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईतील ३६ मतदारसंघांतील ९९ टक्के जागांचा तिढा सुटला असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली, तर मुंबईत शिवसेना हा मोठा भाऊ आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

दरम्यान, राजकारणाची समीकरणे कधी बदलतील हे सांगता येणार नाही. त्यामुळे आज कोण कोणाबरोबर आणि उद्या कोण कोणाबरोबर याचा काहीच अंदाज बांधता येत नाही, असे शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे ‘मविआ’च्या जागावाटपाचा तिढा सुटणार की गुंतागुंत वाढणार हे मंगळवारी २७ तारखेच्या मविआच्या जागावाटपाच्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल, असे चित्र दिसत आहे.

मुंबईतील ९९ टक्के जागांवर मविआची सहमती झाली असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मुंबई पुन्हा आमच्या ताब्यात असणे गरजेचे आहे. त्यानुसार जागावाटप होणार आहे असेही ते म्हणाले, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हणाले की, “विधानसभेच्या २८८ जागा आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे काही बदल होणे अपेक्षितच आहे. त्यामुळे त्याबाबत चर्चा तर होणारच.

लोकसभेप्रमाणे एकमेकांना समजून मार्ग काढू - जयंत पाटील

दरम्यान, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणूकही ‘मविआ’ला एकत्र लढायची आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना समजून घेऊन मार्ग काढू, असेही जयंत पाटील म्हणाले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक