महाराष्ट्र

Video : चिपळूणमध्ये रस्त्यावर महाकाय मगरीचा मुक्तसंचार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

चिपळूण शहरामधील चिंचनाका परिसरातील रस्त्यावर महाकाय मगर आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

Suraj Sakunde

रत्नागिरी: चिपळूण शहरातील चिंचनाका परिसरात महाकाय मगर आढळल्यानं खळबळ उडाली. रविवारी रात्री ८ वाजता चिंचनाका परिसरातील रस्त्यामध्ये महाकाय मगरीचं दर्शन झालं. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिव नदीत मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. आता या मगरी थेट नागरी वस्तींजवळील रस्त्यांवर आढळून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. चिपळूणमधील रस्त्यांवर आलेल्या या मगरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नागरी वस्तीत मगरींच्या वावर-

दरम्यान या घटनेमुळं चिपळूण शहरातील मगरींच्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वशिष्ठी तसेच शिव नदीत मगरींचा वावर प्रचंड आहे. खासकरून पावसाळ्यात अनेकदा या मगरी शहरात मानवी वस्तीमध्ये वावरताना दिसून येतात. यापूर्वी शहरातील गोवळकोट भागात मगर आढळून आली होती. त्यानंतर आता चिंचनाका परिसरातील मुख्य रस्त्यावर मगर आढळल्यानं नागरिकांध्ये घबराट निर्माण झाली आहे. नागरी वस्तीत मगरींच्या वावरामुळं नागरीक चिंतेत आहेत. प्रशासनानं मगरी नदीपात्र सोडून शहरात पोहोचणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी देखील होतं आहे.

मगरीचा व्हि़डिओ होतोय व्हायरल...

रविवारी रात्री चिंचनाका परिसरात महाकाय रस्त्यावर दिसून आली. ही मगर पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांची पुरती तारांबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी मगरीचा रस्त्यावरील व्हिडीओ फोनमध्ये चित्रित केला. या व्हिडिओमध्ये एका डांबरी रस्त्यावर एक महाकाय मगर बिनधास्तपणे येताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोश मीडियावर व्हायरल झाला आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत