नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खास गोडाचा बेत! ट्राय करा शाही चवीचा 'कॅरॅमल शिरा'

असं म्हणतात, नवी सुरुवात नेहमी गोड पदार्थानेच करावी. नव्या वर्षात गोडवा वाढवण्यासाठी हा शाही चवीचा कॅरॅमल शिरा एकदम परफेक्ट आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खास गोडाचा बेत! ट्राय करा शाही चवीचा 'कॅरॅमल शिरा'
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खास गोडाचा बेत! ट्राय करा शाही चवीचा 'कॅरॅमल शिरा'
Published on

असं म्हणतात की कोणतीही नवी सुरुवात गोड पदार्थाने केली, तर पुढचा प्रवासही गोड आणि समाधानकारक होतो. नव्या वर्षाच्या सुरुवातीला घरात गोडाचा सुगंध दरवळावा, मन प्रसन्न व्हावं आणि क्षण खास वाटावेत, यासाठी एखादा वेगळा गोड पदार्थ नक्कीच हवा. नेहमीच्या शिऱ्यापेक्षा हटके, शाही चव असलेला कॅरॅमल शिरा त्यासाठी परफेक्ट निवड ठरू शकतो. कमी साहित्य, झटपट कृती आणि तोंडात टाकताच विरघळणारी चव यामुळे हा शिरा नक्कीच खास ठरेल.

साहित्य:

  • रवा

  • दूध

  • पाणी

  • साखर

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खास गोडाचा बेत! ट्राय करा शाही चवीचा 'कॅरॅमल शिरा'
Weekend होईल आणखीनच खास! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट बटाटा सँडविच
  • तूप

  • सुका मेवा (काजू, बदाम, मनुका)

  • केशर

  • वेलची पावडर

कृती:

कॅरॅमल शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका वाटीत दूध घेऊन त्यात रवा भिजत ठेवा. साधारण १० मिनिटांत रवा मऊ होतो, त्यामुळे शिरा मऊ आणि रेशमी लागतो. आता कढईत थोडं तूप गरम करून काजू, बदाम, मनुका असा सुका मेवा हलका सोनेरी होईपर्यंत भाजून बाजूला काढून ठेवा. त्याच कढईत पुन्हा थोडं तूप घालून दुधात भिजवलेला रवा घाला आणि मध्यम आचेवर सतत ढवळत हलका परतून घ्या. रवा चांगला परतला की गॅस मंद ठेवा, म्हणजे तो जळणार नाही.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खास गोडाचा बेत! ट्राय करा शाही चवीचा 'कॅरॅमल शिरा'
'आज डब्यात काय?' चा प्रश्न मिटला! १० मिनिटांत तयार होणारा कांदा-कोथिंबीर पराठा

दुसऱ्या कढईत तूप गरम करून त्यात साखर घाला. साखर हळूहळू वितळून कॅरॅमलसारखा हलका तपकिरी रंग येईपर्यंत परता. साखर जास्त जळू देऊ नका. त्यात दूध घालून नीट मिक्स करा. आता या मिश्रणात परतलेला रवा आणि भाजलेला सुका मेवा घाला. त्यात केशर आणि वेलची पावडर घालून सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळा. झाकण ठेवून मंद आचेवर ५ मिनिटं शिजू द्या. शिरा घट्ट आणि मऊ झाला की गॅस बंद करा. गरमागरम कॅरॅमल शिरा सर्व्ह करा.

टिप्स:

  • कॅरॅमल करताना साखर जास्त जळली तर शिरा कडू लागतो, त्यामुळे रंग बदलताच दूध घाला.

  • शिरा अधिक मऊ हवा असेल तर दूध आणि पाण्याचे प्रमाण समान ठेवा.

  • खास सुगंधासाठी शेवटी थोडं तूप वरून सोडू शकता.

  • मुलांसाठी बनवत असाल तर कॅरॅमल फार गडद करू नका.

  • शिरा गरमच सर्व्ह केल्यास त्याची चव अधिक खुलते.

logo
marathi.freepressjournal.in