महाराष्ट्र

मलकापूरात लक्झरी बसचा भीषण अपघात; 6 जण ठार तर २५ गंभीर जखमी

अरनाथहून हिंगोली जाणाऱ्या लक्झरी बसला एका दुसऱ्या भरधाव येणाऱ्या लक्झरी बसने समोरुन जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

नवशक्ती Web Desk

अरनाथहून हिंगोली जाणाऱ्या लक्झरी बसला एका दुसऱ्या भरधाव येणाऱ्या लक्झरी बसने समोरुन जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. यात अतीगंभीर जखमी झालेल्या पाच रुग्णांना बुलढाणा येथे हलवण्यात आलं आहे. मात्र, त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ६ वर मलकापूर नजीकच्या लक्ष्मी नगरातील रेल्वे उड्डाण पुलावर आज शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

हिंगोलीतील ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस अमरनाथहून ४० प्रवाशांना घेऊन हिंगोलीकडे परत जात होती. आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास नागपूरवरुन नाशिककडे जात असलेल्या बसने हिंगोली जाणाऱ्या बसला समोरुन धडकी दिली.

या अपघातात हिंगोलीला परत असलेल्या बस मधील पाच प्रवासी हे जागीच ठार झाले. तर २५ जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं. यामुळे महामार्गावर काही काळ चक्का जाम झाला होता.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव