महाराष्ट्र

Video : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तारांची स्टेजवरुनच शिवीगाळ: प्रकरण अंगाशी येताच, म्हणाले...

विरोधकांनी त्यांना धारेवर धरत जोरदार टीकास्त्र सोडताच सत्तार यांनी त्यावर सारवासारव केली आहे.

Rakesh Mali

राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोडमध्ये नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात काही अतिउत्साही तरुणांनी हुल्लडबाजी केली. हे पाहून सत्तारांना संताप अनावर झाला. यानंतर ते थेट स्टेजवर चढले आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांना अभद्र शिवीगाळ केली. त्यावरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरत जोरदार टीकास्त्र सोडताच सत्तार यांनी त्यावर सारवासारव केली आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार?

अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी केली, त्यांना आवरण्यासाठी या मंत्री महाशयांनी पोलिसांना थेट लाठीचार्ज करण्याचेच आदेश दिले. सत्तार म्हणाले, “अरे खाली बस नाहीतर बाहेर जा. पोलिसवाले यांच्यावर लाठीचार्ज करा. त्यांना इतके मारा त्यांच्या *ची हड्डी तोडून टाका. * तुझ्या बापाने कधी पाहिला होता का कार्यक्रम, तू राक्षस आहे का? माणसाची औलाद आहे माणसासारखा कार्यक्रम पाहा. एक हजार पोलिस आहेत, हाणा यांना ५० हजार लोकांना, काय फरक पडतो. हे जे बोगस लोक आहेत, हे फक्त वाद घालण्यासाठी आले आहेत. ए बस ना खाली तुझ्या घरी पण असाच उभा राहतो का? तुझ्या आई वडिलांचा पिक्चर पाहतो का ? यांना दुसरी भाषा कळत नाही”, अशी अर्वाच्च भाषा त्यांनी वापरली.

सत्तारांकडून सारवासारव -

"विरोधकांनी गोंधळ घालण्यासाठी हुल्लडबाज पाठवली होती. पाच पंचवीस हुल्लडबाज लोकांना पाठवून कार्यक्रम फेल व्हावा, कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचा, कार्यक्रम उधळण्याचा कट होता. त्यांना कंट्रोल करण्यासाठी मी आमच्या ग्रामीण भागाची बोली आहे, त्या शब्दामध्ये बोललो. त्याच्यामुळे कोणाच्याही मनामध्ये काही शंका-कुशंका झाली असेल तर, मी निश्चीत त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सिल्लोडमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला कोणीही गालबोट लावण्याचे काम करु नये. मी जे शब्द बोललो त्या शब्दांबद्दल कोणाची मने दुखले असतील तर परत एकदा मी खेद व्यक्त करतो", असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी कालच्या घटनेवर आपले स्पष्टीकरण दिले आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

भारतीय संघाची सामन्यावर पकड;जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते