विद्यार्थ्यांपेक्षा मंत्र्यांच्या कुत्र्यांना चांगल्या सुविधा; अभिजीत दीपके आक्रमक, दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांपेक्षा मंत्र्यांच्या कुत्र्यांना चांगल्या सुविधा; अभिजीत दीपके आक्रमक, दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी

सरकारी शाळांची अवस्था अत्यंत बिकट असून विद्यार्थ्यांपेक्षा मंत्र्यांच्या कुत्र्यांना चांगल्या सुविधा मिळतात, असा गंभीर आरोप ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संयोजक अभिजीत दीपके यांनी केला असून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Swapnil S

लातूर : सरकारी शाळांची अवस्था अत्यंत बिकट असून विद्यार्थ्यांपेक्षा मंत्र्यांच्या कुत्र्यांना चांगल्या सुविधा मिळतात, असा गंभीर आरोप ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संयोजक अभिजीत दीपके यांनी केला असून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दीपके यांच्या नेतृत्वाखालील ‘स्कूल ठीक करो’ (शाळा दुरुस्त करा) अभियानांतर्गत सीजेपीच्या टीमने लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजणी येथील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दीपके यांनी सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधींवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. अनेक नेते धर्म धोक्यात असल्याच्या गप्पा मारतात. एवढ्या वर्षांत धर्म नष्ट झाला नाही, तो तुमच्या कार्यकाळात कसा धोक्यात येईल, धर्म कुठेही जाणार नाही, पण आपल्या मुलांचे भविष्य नक्कीच धोक्यात येत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

मुलांच्या आयुष्याचा प्रश्न असताना राजकीय नेते काहीही करत नसतील, तर लोकांनी त्यांना का मतदान करावे, गेल्या १० वर्षांत गळकी पत्र्याची छपरे आणि बाक्यांची सोय सरकार करू शकले नसेल, तर त्यांनी काय प्रगती केली याचे उत्तर दिले पाहिजे, असा सवाल त्यांनी केला.

गावागावांत जंतरमंतरसारखे आंदोलन

सरकारी शाळा नीट नाही केल्या तर गावागावामध्ये जंतरमंतरसारखे आंदोलन होईल. अनेकजण रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. हा केवळ सीजीपेचा परिणाम आहे, असे पाहू नका. लोकांना दहा-बारा वर्षानंतर प्रश्न उपस्थित करता येत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. सीजेपीसारखी आंदोलने आणि संघटना असायला हव्यात. लोकशाहीत हेच पाहिजे. लोक जेवढे समोर येऊन बोलतील तेव्हाच आपली लोकशाही आणखी मजबूत होईल.

शाळा सरकारी, विद्यार्थी खासगी

अभिजीत दीपके यांनी यांच्या जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या भेटीच्या वेळी समोर बसवलेले विद्यार्थी खासगी शाळेतले असल्याचे आढळून आले. दीपकेंच्या उपस्थितीतच विद्यार्थ्यांनी आपण पीपल्स प्रायमरी स्कूल या खासगी शाळेतील असल्याची कबुली दिली. शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी आणि चांगले चित्र उभे करण्यासाठी शिक्षकांनी हे केले असावे असा तर्क आहे. दीपकेंनी याबाबत सोशल मीडियात फोटोसहित पोस्ट केली व दर्जा सुधारण्याऐवजी अशी फसवणूक का केली जात आहे असा सवाल केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : भक्तांना दिलासा! POP च्या मोठ्या मूर्तींचे विसर्जन समुद्रात; उच्च न्यायालयाचा गतवर्षीचा निर्णय कायम

डिसुझा फुटबॉल मैदान प्रकरण : स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश; आरक्षण बदलण्याच्या निर्णयावरून BMC ला धरले धारेवर

सुट्या खाद्यतेल विक्रीवर बंदी; अन्न आणि औषध प्रशासनाची घोषणा, उल्लंघन केल्यास ७ वर्षांपर्यंत कारावास

साखरेच्या साठेबाजीला चाप; सणासुदीच्या तोंडावर व्यापाऱ्यांवर बंधने, ग्राहकांना दिलासा

अमेरिकी धर्मस्वातंत्र्य आयोगाची रा. स्व. संघावर बंदीची मागणी