सौजन्य - एक्स
महाराष्ट्र

शिखर बँक घोटाळ्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची अचानक बदली; बदलीचे कारण मात्र गुलदस्त्यात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असलेला २५ हजार कोटींचा शिखर बँक घोटाळा, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित महाराष्ट्र सदन व कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा, एकनाथ खडसे हे आरोपी असलेला भोसरी भूखंड गैरव्यवहार आदी महत्त्वाच्या घोटाळ्यांच्या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : आमदार, खासदारांविरोधातील खटले चालवणाऱ्या विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या न्यायालयात काही सत्ताधारी आमदार, मंत्र्यांविरोधातील खटले सध्या अंतिम टप्प्यात आहेत. याचदरम्यान फोर्ट येथील विशेष न्यायालयातून दिंडोशी सत्र न्यायालयात त्यांची बदली करण्यात आली. मात्र या बदलीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असलेला २५ हजार कोटींचा शिखर बँक घोटाळा, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित महाराष्ट्र सदन व कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा, एकनाथ खडसे हे आरोपी असलेला भोसरी भूखंड गैरव्यवहार आदी महत्त्वाच्या घोटाळ्यांच्या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे.

नवनीत राणा व रवी राणा या दाम्पत्याविरोधातील हनुमान चालीसा पठणचा खटलाही त्यांच्याच कोर्टात सुरू आहे. राज्य मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळ्यात छगन भुजबळ यांना वॉरंटचा इशारा दिला होता. तसेच शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांना मुंबई पोलिसांनी दिलेली ‘क्लीनचिट’ ईडीच्या विरोधामुळे लटकली आहे. त्यावर न्यायाधीश रोकडे १२ जुलैला सुनावणी करणार होते. याचदरम्यान त्यांची दिंडोशी येथील सत्र न्यायालयात बदली झाली आहे. सोमवारी त्यांनी दिंडोशी येथील पदभार स्वीकारल्याचे समजते.

नवी मुंबई विमानतळावर प्रवासी चाचणी यशस्वी; २५ डिसेंबरपासून उड्डाणांना हिरवा कंदील

राज्यात २० जिल्ह्यांतील नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या; नव्याने अर्ज दाखल करण्याची मुभा, सुधारित कार्यक्रमानुसार २० डिसेंबरला मतदान

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; ‘एसआयआर’वरील चर्चेवर विरोधक ठाम

RBI मोठा निर्णय घेणार! पतधोरणात व्याजदरात कपात करणार?

आंध्रात ‘दितवाह’ चक्रीवादळामुळे जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा