महाराष्ट्र

महाकालेश्वरला जाताना अपघात; तीन तरुणांचा मृत्यू

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील भाविकांच्या कारला उज्जैनच्या महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जात असताना कन्नड घाटात अपघात झाला

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील भाविकांच्या कारला उज्जैनच्या महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जात असताना कन्नड घाटात अपघात झाला. या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शेवगाव येथील सात मित्र कारने उज्जैनकडे जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार वेगात घाटाच्या संरक्षण कठड्याला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा चेंदामेंदा झाला. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिक आणि चाळीसगाव ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

४ दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून घरी आला आणि… ; परभणी संविधान शिल्प विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता पवारची आत्महत्या

डोनाल्ड ट्रम्प 'व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'; स्वतःच केले जाहीर; ट्रुथ सोशलवरील पोस्टने खळबळ

RTI अंतर्गत एनपीए, थकबाकीदारांची माहिती सार्वजनिक होणार? RBI च्या भूमिकेविरोधात ४ प्रमुख बँकांची CIC कडे धाव

जी-उत्तर : मुंबईतील महत्त्वाच्या राजकीय लढतींचा केंद्रबिंदू; तीन नवीन मेट्रो स्थानकांमुळे धारावी परिसराची शहराशी जोडणी अधिक सुलभ

...तर अमेरिकन, इस्रायली सैन्य लक्ष्य ठरेल; इराणचा सडेतोड इशारा