महाराष्ट्र

दावोस दौऱ्यासाठी स्वतः खर्च करून निघालेल्यांची नावे जाहीर करा, आदित्य ठाकरेंचे आव्हान

माझ्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर घाबरलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाने घाईघाईने दावोस दौऱ्याची किरकोळ माहिती जाहीर करुन तेथे होऊ घातलेल्या काही करारांची माहिती उघड केली, असेही त्यांनी म्हटले.

Rakesh Mali

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या शिष्टमंडळाच्या दावोस दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा टीकास्त्र सोडले आहे. "दावोस दौऱ्यावर स्वतः खर्च करून निघालेल्या व्यक्तींची नावे जाहीर करा आणि महाराष्ट्राच्या शिष्टमंडळात त्यांची भूमिका, जबाबदारी काय असेल तेही स्पष्ट करा", असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना केले आहे.

दावोस दौऱ्यावर शिष्टमंडळ स्वत:ताच्या खर्चाने गेले असून दौऱ्याचा सर्व सगळा हिशोब जनतेला देणार असल्याचे सामंत यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले होते. तसेच वेदांता फॉक्सकॉन आम्ही घालवला नव्हता, तो घालवल्याचा आरोप आमच्यावर केला जातो, अशी टीकाही त्यांनी केली होती. सामंत यांनी दिलेल्या दिलेल्या उत्तरावर आदित्य यांनी ट्वीट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्र्यांना दावोस दौऱ्यावर स्वतः खर्च करून निघालेल्या व्यक्तींची नावे जाहीर करण्याचे थेट आव्हान दिले आहे. तसेच, महाराष्ट्राच्या शिष्टमंडळात त्यांची भूमिका, जबाबदारी काय असेल तेही स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

तसेच, माझ्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर घाबरलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाने घाईघाईने दावोस दौऱ्याची किरकोळ माहिती जाहीर करुन तेथे होऊ घातलेल्या काही करारांची माहिती उघड केली, असेही त्यांनी म्हटले.

एकीकडे उद्योग मंत्री करारांची माहिती उघड करायला पत्रकार परिषदेत नकार देत असताना त्याचदरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाने हे तपशील जाहीर केल्याचेही ते म्हणाले.

काय म्हणाले उदय सामंत?

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंचे आरोप खोडून काढले होते. दौऱ्यावरून आल्यानंतर खर्च केलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब महाराष्ट्रातील जनतेला आपण देणार आहोत, ते देखील पुराव्यासकट. आजचे जे आकडे दिले जात आहेत, ते फक्त मनोरंजन म्हणून पहावेत. यांच्या काळात चांगले एमओयू झाले नाहीत. आमच्या काळात होत आहेत, हे दु:ख आहे. ज्यांनी पोलिसांकरवी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवले, त्यांनी किती जणांचे शिष्टमंडळ असावे, याचे मार्गदर्शन करू नये. जागतिक पातळीवर महाराष्ट्राचे नाव मोठे करण्यासाठी कोणी आपल्या खिशातून पैसे खर्च करत असेल तर त्यात वाईट काय आहे, असा सवाल उदय सामंत यांनी केला पत्रकार परिषदेत केला होता.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी