आदित्य ठाकरे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंचे व्हिजन महाराष्ट्र; वाहतूककोंडी फोडणे, प्रदूषण रोखणे मुख्य लक्ष्य

मुंबईत प्रदूषणात वाढ झाली असून प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम ठिकाणी कायमस्वरुपी कठोर नियमावली करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत वाढ करणे, बेस्ट बसेसची संख्या वाढवणे, जनतेच्या सृदृढ आरोग्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आपले लक्ष्य असल्याचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Swapnil S

मुंबई : गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात बेकायदा मुख्यमंत्री आणि महायुती काम करत आहे. अडीच वर्षांत फक्त महाराष्ट्राची लूट केली आहे. मात्र राज्यातील जनतेसाठी काय केले याचे उत्तर त्यांच्याकडे ही नाही. मुंबईत प्रदूषणात वाढ झाली असून प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम ठिकाणी कायमस्वरुपी कठोर नियमावली करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत वाढ करणे, बेस्ट बसेसची संख्या वाढवणे, जनतेच्या सृदृढ आरोग्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आपले लक्ष्य असल्याचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारांना आश्वासने देत आहे. परंतु मुंबईला नेमके काय पाहिजे, याबाबत वरळीतील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचे व्हिजन काय हे जाणून घेण्यासाठी सोमवारी चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबरमध्ये मुंबई फर्स्ट आणि मुंबई प्रेस क्लबच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

अडीच वर्षांपूर्वी मुंबई पालिकेच्या तिजोरीत ९० हजार कोटींच्या ठेवी होत्या, त्या अडीच वर्षांत ८० हजार कोटींवर आल्या आहेत. बेकायदा मुख्यमंत्री आणि महायुती सरकारने पालिकेच्या तिजोरीची लूट केली आहे. त्यामुळे महायुतीचे व्हिजन महाराष्ट्र लूट आहे, असा टोला त्यांनी महायुतीला लगावला.

मुंबई महापालिकेसह म्हाडा, एसआरए, रेल्वे वेगवेगळी प्राधिकरणे मुंबईत आहेत. विविध प्राधिकरणे असल्याने मुंबईच्या विकासात अडचण निर्माण होते. मुंबई महापालिका अशी एकच प्राधिकरण स्थापन करून मुंबईच्या विकासासाठी अधिकार दिले तर मुंबईचा विकास शक्य आहे. मुंबईतील सगळेच रस्ते सिमेंट काँक्रीटचे हवे असे नाही, काही रस्ते सिमेंट काँक्रीटचे तर काही रस्ते अस्फाल्टचे बनवले पाहिजे, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प आणला. राज्यात मविआचे सरकार सत्तेत असताना ६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक आणली. मुंबईची लाईफलाईन, रेल्वेने दररोज ७० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची संख्या लक्षात घेता मेट्रो रेल प्रकल्प हाती घेतला. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढीवर भर देत २०२७ पर्यंत १० हजार इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. ९०० एसी डबलडेकर बसेस आणण्याचे नियोजन केले. मात्र राज्यात महायुती लुटीचे सरकार सत्तेत आले आणि बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागली, असा टोला त्यांनी लगावला.

व्हिजन मुंबई

मुंबईकरांना मोकळे फुटपाथ

देवस्थान परिसरात बेकायदा पार्किंग हटवणार

लटकत्या केबल हटवणार

बेस्ट बसेसची संख्या वाढवणार

प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅनची अंमलबजावणी

धारावीचा पुनर्विकास करा, पण चौकटीत राहून - आदित्य ठाकरे

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राजकारण चांगलेच तापले आहे. धारावीचा पुनर्विकास होत असताना येथील रहिवाशांना आहे त्या ठिकाणी घर मिळाले पाहिजे. फक्त कोणा मित्रांसाठी धारावीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईची लूट नको. धारावीचा पुनर्विकास हवा आहे, पण कायद्याच्या चौकटीत राहून असेल तर आमचा विरोध नाही, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात