महाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेतला भाजपचा समाचार

संजय राऊत यांना ईडीकडून झालेल्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक

वृत्तसंस्था

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून झालेल्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी राऊत कुटुंबीयांची भेट देखील घेतली. यानंतर पत्रकार परिषद घेत भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. तसेच भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना खडे बोल सुनावले.

पत्रकार परिषदेमध्ये काय मुद्दे मांडले ?

- संजय राऊत यांचा मला नक्कीच अभिमान

- संजय राऊत शरण जाऊ शकले असते, पण ते गेले नाहीत कारण ते हाडाचे शिवसैनिक आहेत.

- सध्याच्या सरकारने चेहऱ्यावर फेस लावला आहे, तो फेस गेला की, त्यांना परिस्थितीची जाणीव होईल.

- लोकांनी डोळे उघडे ठेवून सर्व पाहिलं पाहिजे की, देशाची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली